<cesDoc id="mar-w-socsci-cater-ho00a006.maf" lang="mar">
<cesHeader type="text">
<fileDesc>
<titleStmt>
<h.title>mar-w-socsci-cater-ho00a006.maf.txt</h.title>
<respStmt>
<respType>Electronic file created by</respType>
<respName>Central Institute for Indian Languages, Mysore</respName>
<respType>transferred into Unicode and CES format by</respType>
<respName>"Unicodify" software by Andrew Hardie</respName>
</respStmt></titleStmt>
<publicationStmt>
<distributor>UCREL (on behalf of CIIL)</distributor>
<pubAddress>Department of Linguistics, Lancaster University, Lancaster, LA1 4YT, UK</pubAddress>
<availability region="WORLD"></availability>
<pubDate>03-07-25</pubDate>
</publicationStmt>
<sourceDesc>
<biblStruct>
<monogr>
<h.title>भरतकाम</h.title>
<h.author>सौ.प्रभावती रा.पुरम</h.author>
<imprint>
<pubPlace>India</pubPlace>
<publisher>Unknown - सौ. सविता सुधा'र जोशी</publisher>
<pubDate>1982</pubDate>
</imprint>
<idno type="CIIL code">ho00a006.maf</idno>
</monogr></biblStruct></sourceDesc></fileDesc>
<encodingDesc>
<projectDesc>Text collected for the CIIL Corpus, subsequently integrated into the EMILLE/CIIL Monolingual Written Corpora.</projectDesc>
<samplingDesc>Simple written text only has been transcribed. Diagrams, pictures and tables have been omitted. Sampling begins at page द्वितीयावृ慭⵲⵷潳獣楣挭瑡牥栭は愰〰⸶慭f쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌쳌mar-w-socsci-cater-ho00a006.maf.</samplingDesc>
<editorialDecl><conformance level="1"></conformance></editorialDecl>
</encodingDesc>
<profileDesc>
<creation><date>03-07-25</date></creation>
<langUsage>Marathi</langUsage>
<wsdUsage>
<writingSystem id="ISO/IEC 10646">Universal Multiple-Octet Coded Character Set (UCS).</writingSystem>
</wsdUsage>
<textClass>
<channel mode="w">print</channel>
<constitution type="composite"></constitution>
<domain type="public"></domain>
<factuality type="fact"></factuality>
</textClass>
<translations></translations>
</profileDesc>
<revisionDesc></revisionDesc>
</cesHeader>

<text><body>

<p>एकूण पाने :-23
FROM 1 TO 24</p>

<p>
--------------------------------------------------------
+</p>

<p>पान नं. 1</p>

<p>भरतकलेचा इतिहास</p>

<p>स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषयांत भरतकलेला अग्रक्रम द्यावा
लागेल. अगदी अनादिकालापासून ज्या वेळी सध्यासारख्या विविध
प्रकारच्या सुंदर सुया व तलम कापड नव्हते त्या काळी रानटी
अवस्थेत असलेल्या स्त्रीने हाडांपासून तयार केलेल्या सुईच्या
साहाय्याने झाडाच्या वल्कलावर व जनावरांच्या कातड्यावर भरतकला
केलेली आहे.</p>

<p>भरतकला म्हणजे काय ? कापडावर सुईच्या साहाय्याने,
निरनिराळ्या धाग्यांनी विविध प्रकारचे टाके घालून व आकर्षक
रंगसंगती साधून तयार केलेली सुबक, आकर्षक व मनोवेधेक
अशी कलाकृती तीच भरतकला होय.</p>

<p>उत्पत्ती : कलाकौशल्य म्हणजे दैनंदिन गृहकृत्ये सांभाळून
फावल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या घराचे सौंदर्य व वैयक्तिक
कपडे सुशोभित करणे. स्त्रियांचा हा एक आवडता छंद समजला
जात असे. या छंदामधूनच भरतकलेचा उगम झाला.
या कलेचा उगम व विस्तार पौर्वात्य देशात विशेषतः भारतात
झालेला आहे. भारतीय भरतकला भारतीय संस्कृतीप्रमाणेच समृद्ध
असल्याने सुवर्णयुगात या कलेने मानाचे स्थान मिळविले होते.
परंतु अनेक वर्षे टिकाव धरण्याचे सामर्थ्य कपड्यात नसल्यामुळे
भारतीय भरतकलेचे नमुने आज जरी दाखविता आले नाहीत तरी
या कलेचा उगम इतिहासपूर्व काळात झालेला आहे हे मात्र
निश्चित.
मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात भरतकलेचे अनेक
नमुने सापडले आहेत. तसेच ब्रॉझच्या सुयाही सापडल्या आहेत.
महाकवी कालिदास, बाणभट्ट, भारवि व इतर प्राचीन कवी यांच्या
संस्कृत वाङमयात भरतकलेचा उल्लेख आहे. चौथ्या शतकात चंद्र-
गुप्त मौर्याच्या काळात आलेला ग्रीक तत्त्ववेत्ता मेगॅस्थेनिस याने
सुंदर भरतकला केलेल्या कपड्यांचे वर्णन केलेल आहे. त्याचप्रमाणे
अजंठा येथील चित्रांत अनेक व्यक्तींनी भरतकला केलेली वस्त्रे
परिधान केलेली आहेत.</p>

<p>भारताची समृद्ध भरतकला : भारतीय भरतकलेने अनेक
वस्तूंचे सौंदर्य वाढविले आहे. कातडे व त्यापासून बनविलेल्या वस्तू,
पातळ लाकूड, जाडेभरडे तसेच तलम कापड, मलमल, रेशमी व</p>

<p>लोकरी, कपडे, तसेच जाळीदार कापड इत्यादींवर भरतकला केलेली
आढळते. जगाला ज्ञात असलेल्या बहुतेक सर्व टाक्यांचा त्यात
समावेश झालेला आहे. सौम्य व मनोवेधक रंग, तसेच साधे व
चित्तवेधक आकार ह्याकरिता ही कला प्रसिद्ध आहे.</p>

<p>भारतीय भरतकला अनेक प्रकारांनी नटलेली आहे. तिच्यात
काश्मीरचे सौंदर्य आहे, लखनौचा रेखीवपणा आहे, कच्छ, काठे-
वाड, गुजरातचा रंगीत डौल आहे, पंजाबचे निरागस हास्य आहे
व त्याचप्रमाणे दक्षिणेची नितांत भक्ती आहे. जगातील भरतकलेत
भारतीय भरतकलेचा क्रम बराच वर लागतो. कोयरीचा आकार
हा भारतीयांच्या आवडत्या आम्रफलापासून आलेला आहे. हा
मनमोहक आकार थोड्याफार फरकाने बहुतेक सर्व प्रांतांतील
भरतकलेत आढळतो. तसेच भरतकलेत मोराचेही वेगवेगळ्या
आकारांत व मोहक रंगांत दर्शन घडून येते.</p>

<p>वारसा व प्रसार : चित्र, नृत्य, शिल्प व संगीत या कलांची
जेवढी द्रुतगतीने भरभराट झाली तेवढी भरतकलेची झाली नाही.
कारण त्या काळी ही कला इतर कलांप्रमाणे जीवनाचे ध्येय बनली
नाही. संसारातील रोजची कामे सांभाळून फुरसतीच्या वेळी भरत-
कला करून पोशाखाची शोभा व गृहशोभा वाढविणे यापेक्षा फारसे
महत्त्व या कलेला दिले गेले नाही. पूर्वी ज्याप्रमाणे इतर कलांसाठी
शाळा किंवा शिक्षण संस्था स्थापिल्या गेल्या तशा संस्था या कले-
साठी सुरू झालेल्या नव्हत्या. तेव्हा त्या कलेचा वारसा आईपासून
मुली शिकत व मुलीपासून तिच्या मैत्रिणी शिकत. याप्रमाणेच
पिढ्यान््पिढ्या कलेचा प्रसार होत गेला.</p>

<p>परकीयांची छाप :  नंतरच्या काळात भारताचा परकीय देशांशी
दळणवळण व व्यापार वाढला. इतर गोष्टींप्रमाणेच भरतकलेवरही
परकीयांच्या कलेची व संस्कृतीची छाप पडू लागली. प्रथम पर्शिया,
चीन, ग्रीस ,आशियामायनर या देशांशी व्यापार वाढला. त्यामुळे
पर्शियन लोकांची डिझाईन्स व रंगसंगती यांचे भारतीय कलाकार
आपल्या गालिच्यात अनुकरण करू लागले. भारतीय व पर्शियन
डिझाईन्स यांच्या एकीकरणाने डिझाईनमध्ये परकी छटा येऊन
सुधारणा झाली. तेराव्या शतकाच्या सुरूवातीला मोगल आक्रमण व
अंमल उत्तर हिंदुस्थानात पसरल्यावर त्या चित्राचे नमुने व भडक</p>

<p>पान नं. 2</p>

<p>रंगसंगती याचा भरतकेलवर बराच परिणाम झाला. स्पेन, जर्मन
इत्यादी देशांशी व्यापार वाढल्यावर त्यांच्याही कलाकुसरीचा परिणाम
भरतकलेत दिसून येतो.</p>

<p>भरतकलेवरील साहित्य :  आपल्या देशात या कलेचा प्रसार
जरी झालेला होता तरी ती येथे वैयक्तिक स्वरूपाचे होती. तसेच
या कलेच्या सर्व अंगांचा अभ्यास केवळ छंद व उपजीविका यासाठी
केला गेला. कलेच्या विस्ताराच्या बाबतीत कारागिरांचा विशाल
दृष्टिकोण नसल्यामुळे या कलेवर वाङमयीन साहित्य लिहिण्याची
गरज भासली नाही. त्यामुळे भारतात मात्र या विषयावरील वाङमयीन
साहित्य लिहिल्याचे फारसे ज्ञात नाही.
नंतरच्या काळात पाश्चात्यांनी आपल्या कलेत व त्यावरील
वाङमयात खूप भर घातली. सोळाव्या शतकात इटलीमध्ये प्रथम
भरतकलेच्या नमुन्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर सतराव्या
शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये अशी बरीच पुस्तके छापली गेली.
या पुस्तकांत पशुपक्षी, रंगीत मासे, फुले अशा प्रकारच्या
आकृत्यांचा समावेश झालेला आहे. यापुढे या विषयावरील वाङमयात
हळूहळू भर पडत गेली. सध्याच्या काळात या विषयावर मुबलक
साहित्य आढळते.</p>

<p>स्वातंत्र्योत्तर परिस्थिती :  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
इतर कलांप्रमाणेच भरतकलेलाही सरकारकडून उत्तेजन मिळाले.
यासाठी खास सरकारमान्य संस्था आहेत. या कलेचा वार्षिक
अभ्रासक्रम ठरवून सरकारी परीक्षा घेतला जातात. एस्.एस्.
सी.च्या चौसष्ट विषयांपैकी एक विषय म्हणून ही कला समजली
जाते. सरकारने दिलेल्या उत्तेजनामुळे सामान्य लोकांत आवड
उत्पन्न होत आहे.</p>

<p>पुरातन कालापासून ही कला जतन केलेली आहे. नवे नवे
प्रयोग करून ती वृद्धिंगत करणे ही महत्त्वाची बाब आहे. कलेचे
ज्ञानभांडार इतकेच आहे असेही म्हणता येत नाही. कारण नवीन
शोध, सोयी व माणसांची कल्पकता यामुळे या कलेच्या मर्यादा
वाढत आहेत. ज्ञानभांडार विस्तृत होत आहे. जो भाग आज
अत्यंत उपयुक्त वाटतो तो कालांतराने निरूपयोगी ठरून दुसरा
उदयास येतो. असे जरी असले तरी प्राथमिक गोष्टीवरच कलेची
थोड्याफार फरकाने उभारणी झालेली असते. त्याची ओळख व
कलेच्या विविध अंगोपांगांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे.
कलेच्या क्षेत्रात या मार्गाने विहार करीत असताना जसजसा अधिक
मार्ग आक्रमावा तसतशी या कलेच्या व्याप्तीची कल्पना येते. परं-
पंरेने चालत आलेले कला-कौशल्य सतत अभ्यास व संशोधन
करून आपल्या पूर्वजांपेक्षाही आपण जास्त प्रगत होऊन भरत-
कलेकडे सर्वाचे लक्ष वेधू या व भरतकलेच्या विविध प्रकारांची
सविस्तर माहिती करून घेऊ या.</p>

<p>भरतकलेचे नियम</p>

<p>कोणत्याही कलेची शास्त्रशुद्ध पायावर उभारणी करणे हे अत्या-
वश्यक आहे व शास्त्रीय दृष्टिकोणसमजण्यासाठी काही नियमांचे
काटेकोर पालन करणे हेही तितकेच जरूरीचे आहे.
1) भरतकलेस सुरूवात करण्यापूर्वी कापडास इस्त्री करावी.
तसेच कामास सुरूवात करण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
हातांचे अगर इतर कसलेही डाग भरतकलेच्या कापडास अगर
आतील भागास पडू न देण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे काम स्वच्छ
व सुबक दिसेल.
2) भरतकलेतील धागा कधीही हाताने अथवा दाताने तोडू
नये. त्यामुळे धागा ओढला जाऊन केलेल काम खराब होण्याची
शक्यता असते. यासाठी धागा नेहमी कात्रीने कापावा.
3) टापटीप व नीटनेटकेपणाची सवय ठेवावी. म्हणजे
कामात गोंधळ होणार नाही. उलट सुलभता वाढेल.
4) जास्त कामाने अथवा अन्य कारणाने धागा चुरगळला
गेल्यास धागा उपयोगात आणावा.
5) कामाचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यक तेवढाच धागा
वापरावा.
6) वापरावयाचे धागे नेहमी पक्क्या रंगाचे व पक्क्या सुताचे
असावेत. रंग निघून गेल्यास केलेले काम ओंगळ दिसेल. श्रम व
वेळ वाया जाईल. सूत कच्चे असेल तर काम करतेवेळी धागा
वरचेवर तुटल्यामुळे कामात सफाई येणार नाही. कामास वेळ जास्त
लागेल.
7) भरतकामाची सुई बारीक, लांब व टोकदार असावी.
सुईच्या खडबडीत नेढ्यामुळे व बोथट टोकांमुळे धाग्याची खराबी
होऊन कामाची सुबकता बिघडेल. तसेच वेड्यावाकड्या सुयांमुळे
टाके चांगले येणार नाहीत.
8) भरतकाम करताना शक्यतो धाग्याला गाठ मारू नये.
सुरूवात करताना दोन अथवा तीन टिपके टाके घालून सुरूवात
करावी व शेवट करताना शेजारच्या टाक्यातच जिरवावे म्हणजे
भरतकाम सुबक दिसेल.</p>

<p>पान नं. 3</p>

<p>9) कात्रीची टोके नेहमी धारदार असावीत. बोथट कात्रीने
धागा पिंजला जातो व काम ओढले जाऊन खराब होण्याची
शक्यता असते.
10) केलेले काम चांगल्या आवरणात झाकून ठेवावे. भरतकाम
केलेल्या भागावर कापडाची घडी आणू नये. ठेवताना भरलेली बाजू
घडीच्या आतील बाजूस घ्यावी म्हणजे मळणार नाही.
11) भरावयास घेतलेल्या डिझाईनचा भाग एका रंगाच्या
धाग्याने पूर्ण करून नंतरच दुसऱ्या रंगाचा धागा घ्यावा म्हणजे
धागा वाया जाणार नाही,
12) वाया गेलेले धाग्यांचे तुकडे दूर एकत्र ठेवावे म्हणजे
कामात अडथळा येणार नाही,
13) भरतकलेचे साहित्य जागच्या जागी व व्यवस्थित रहावे
यासाठी डबा अथवा पेटी वापरावी. प्रत्येक वस्तू काम होताच
जागच्या जागी ठेवावी.
14) भरतकलेस सुरूवात करण्यापूर्वी डिझाईन व्यवस्थित अस-
ल्याची खात्री करूनच सुरूवात करावी.
15) भरतकाम करण्यासाठी जमिनीवर सतरंजी अथवा चटई
अंथरून बसावे.म्हणजे कापड मळणार नाही. मांडीवर एक कापड
पसरून त्यावर भरतकलेचे कापड येईल अशी दक्षता घ्यावी किंवा
खुर्चीवर बसून भरतकाम करताना टेबल स्वच्छ असल्याची दक्षता
घ्यावी.
16) भरतकामातील धागा जास्तीत जास्त 30 ते 35 सें.मी.
इतकाच लांब असावा. यापेक्षा लांब धाग्याने काम केल्यास क्वचित
धाग्याला गाठ बसते किंवा धागा तुटतो. तसेच धाग्याची चकाकी
कमी होते म्हणून धागा प्रमाणात घ्यावा.
17) धागा सुईत ओवताना तोंडात घालू नये. त्यामुळे धागा
खराब होतो व त्याची चकाकी कमी होते.
18) करावयास घेतलेली वस्तू रोज थोडी तरी करावी. त्यामध्ये
खंड पडू नये. कलाकृतीत फार दिवसांचा खंड पडल्यास टाक्यात
फरक पडतो.
19) नवीन भरतकाम शिकणाऱ्यांनी रेशमी कापड वापरू नये.
शक्यतो पॉपलीन, लॉगक्लॉथ व केसमेंट यासारखे सुती कापड वापरावे.</p>

<p>चित्रकलेचे ज्ञान</p>

<p>निरनिराळ्या प्रकारच्या व रंगाच्या कापडावर त्याची उपयुक्तता
लक्षात घेऊन यथायोग्य डिझाईन काढणे व ते भरून घराची शोभा
वाढविणे, पोशाखाचे सौंदर्य वाढविणे, विविध ठिकाणी भरतकलेच्या
कृती लावून गृहरचनेतील दोष झाकून शोभा आणणे या उद्देशासाठी
भरतकला शिकावी.
भरतकलेत चित्रकलेची जरूरी : भरतकला व डिझाईन यांचा
अभिन्न संबंध आहे. चित्रकलेच्या महत्त्वाच्या अंगांपैकी डिझाईन हे
एक आहे, आणि भरतकलेत डिझाईन ही महत्त्वाची व आवश्यक
बाब आहे. सुबकपणा व सुरेखपणा (रेखीवपणा) चांगल्या डिझाईन-
वर अवलंबून आहे. उत्कृष्ट भरतकला करण्यासाठी चांगल्या डिझाईनची
व रेखाटनाची माहिती असणे, तसेच चांगल्या डिझाईनची निवड
करता येणे आवश्यक आहे. यासाठीच चित्रकलेचे ज्ञान असणे अत्यंत
जरूरीचे आहे.
डिझाईन कशास म्हणावे ? :  मानव हा नेहमीच निसर्गाशी
रममाण होणारा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात तो आपले देहभान
हरवून जातो. अशा या निसर्गातील वृक्ष, पाने, फुले, वेली, खळखळ
वाहणारे निर्झर, धबधबे ह्यांचे निरीक्षण करून त्याला आपल्या
बुद्धिमत्तेची जोड देऊन आकर्षक अशी रचना जेव्हा तो करता
तेव्हा त्याला डिझाईन म्हणता येईल.
डिझाईनचे विषय :  विशाल वृक्ष, नाजूक वेली, आकर्षक फुले,
सुंदर पाने, गोंडस पक्षी, सुरेख प्राणी, नयनरम्य देखावे अशा
अनेक विषयांवर नवनवीन कल्पना वापरून विविध तऱ्हेने (हजारो
प्रकारे) डिझाईन तयार करता येतील. डिझाईनची कापडावर मांडणी
करण्यापूर्वी त्याच्या विषयाचे, रचनेचे व बाह्याकाराचे चांगले
निरीक्षण व परीक्षण करणे अगत्याचे आहे.
आपण आपल्या शरीरातील व रूपातील वैगुण्य सुंदर पोशाख
करून अनेक सौंदर्यप्रसाधने वापरून लपवितो. हीच गोष्ट डिझाईन-
मध्ये नैसर्गिक गोष्टींना अलंकारिक आकार देऊन करावी लागते.
डिझाईनच्या रचनेत गती, तोल व लय याला फार महत्त्वाचे स्थान
आहे. फुले, पाने व सुंदर पक्षी एकदम मन मोहवितात. त्यामुळे
निसर्गरम्य फुलापानांची डिझाईन्स चांगली दिसतात.</p>

<p>डिझाईनचे सहा विभाग व उपयोग :  सर्वसाधारणपणे फुला-
पानांची डिझाईन्स कोणत्याही वस्तूवर सुरेखच दिसतात. तरीपण
डिझाईनची विभागणी व त्यांचे उपयोग करावयाचे झाल्यास सहा
ठळक विभाग पडतात. त्यांचा यथायोग्य उपयोग केल्यास त्यात
जास्त कौशल्य दिसते. हे सहा विभाग पुढीलप्रमाणे-
1. पानाफुलांची डिझाईन्स- Floral
2. वेलबुट्ट्या-नक्ष्या-  Free-Hand Pattern.</p>

<p>पान नं. 5
3. लहान मुलांसाठी - Nursery
4. देखावे- निसर्गचित्रे- Land-Scapes.
5. आद्याक्षरे व अक्षर गुंफण - Initials and Monograms.
6. टाक्यांच्या किनारी -Borders.</p>

<p>1 . फुलापानांची डिझाईन्स : याचा उपयोग सर्वसधारणपणे
कोणत्याही वस्तूंवर करतात. उशीचे अभ्रे, टेबलक्लॉख, सोफासेट,
पडदे इत्यादी.</p>

<p>2. वेलबुट्ट्या -नक्ष्या- (मुक्तहस्त डिझाईन्स) : याचा उपयोग
शाली, साड्या व त्यांच्या किनारी भरण्यासाठी, टोप्यांच्या
किनारी तसेच टेबलक्लॉथच्या किनारी भरण्यासाठी होतो. या
डिझाईन्सचा उपयोग कोणत्याही कपड्यावर करतात.</p>

<p>3. लहान मुलांसाठी : पशुपक्ष्यांची गमतीदार डिझाईन्स
मुलांची मने आकर्षित करतात. म्हणून मुलांच्या पोशाखावर
गमतीदार चित्रे भरल्यास ते उचित होईल. एवढेच नव्हे तर मुलांना
प्रसंगानुरूप म्हणजे मुले जेवताना किंवा दूध पिताना त्यांना
छातीवर बांधण्याच्या लाळेऱ्यावर मांजर दूध पीत असल्याचे किंवा
कुत्रा असल्याचे डिझाईन घ्यावे. बिछान्यावर ससा पांघरूण घेऊन
झोपलेला असल्याचे डिझाईन घ्यावे. साधारण मोठ्या मुलांसाठी प्राणी-
पक्षी, कोठलेही काम किंवा अभ्यास करीत असलेल्या मुलांमुलींची
चित्रे भरल्यास त्यांना चित्रांच्या निमित्ताने त्या त्या गोष्टींची गोडी
वाटू लागले.</p>

<p>4. देखावे निसर्गचित्रे : दिवाणखान्याची शोभा वृद्धिंगत
व्हावी, येणाऱ्या पाहुण्यांना व आपल्याला स्वतःला आनंद व
आल्हाद वाटावा म्हणून आपण तसबिरी लावतो. ह्यासाठी निसर्ग-
चित्राचे भरतकाम केलेल्या तसबिरी लावाव्यात. हे देखावे करण्यास
बरीच मेहनत लागते. केलेल काम दीर्घकाल राहावे यासाठी त्यास
काचेची फ्रेम करणेच योग्य होय.</p>

<p>पान नं. 6</p>

<p>5. आद्याक्षरे व अक्षरगुंफण :  आपल्या वस्तूची पटकन
ओळख पटावी  व वस्तूंची शोभाही वाढावी म्हणून आद्याक्षरे व
अक्षरगुंफण याचा उपयोग होतो. बरीच माणसे असलेल्या घरात
एकमेकांच्या वस्तू सांभाळणे कठीण जाते. अशा वेळी आपापल्या
वस्तूवर विशेषतः चादरी, अभ्रे, टॉवेल व रूमाल यांवर आपल्या
नावांची आद्याक्षरे सुंदर डिझाईनमध्ये गुंफून भरल्यास त्याची शोभा
वाढून सोईस्कर होईल. शाळा-कॉलेज, ऑफिस, कंपन्या व दवा-
खाने येथील सेवकांच्या कपड्यांवर याचा उपयोग केलेला असतो.</p>

<p>6 किनारी:  लहान मुलांच्या व इतर कपड्यांची शोभा वाढ-
विण्यासाठी याचा उपयोग करतात.</p>

<p>वरीलप्रमाणे डिझाईन्स काढता यावीत म्हणून डिझाईन पाहून
त्याप्रमाणे रेखाटने करण्याची सवय करावी. सुरूवातीस रेखाटने
चांगली येणार नाही. परंतु सातत्याने प्रयत्न करीत गेल्यास त्यात
रोज थोडी सुधारणा झाल्याचे निश्चित दिसून येईल. फुलापानांची
चित्रणे येऊ लागली की त्याच फुलापानांची साधी परंतु मनोरंजत
मांडणी करण्यास शिकावे.</p>

<p>आतापर्यत फुलापानांच्या व इतर प्रकारच्या डिझाईनची माहिती
घेतली. यानंतर भौमितिक आकृत्या कशा काढतात व त्यासाठी
कोणती साधने वापरतात याची माहिती घेऊ
भूमितीतील (Geometrical) आकृत्या काढण्यासाठी कंपास-
पेटीतील साधनांची जरूरी असते. त्याचा आपल्या कामासाठी कसा
उपयोग करून घ्यावा, याची संपूर्ण माहिती असावयास पाहिजे.</p>

<p>कंपासपेटीतील उपकरणे</p>

<p>1. कंपास : यांत पितळी धातूच्या किंवा स्टीलच्या दोन
दांड्या एका बाजूस एकत्र जोडलेल्या असतात. ह्या दोन्ही दांड्या
लांब व जवळ करता येतील अशी व्यवस्था केलेली असते. एका
दांडीच्या टोकाशी 3 सें.मी. लांबीची एक लोखंडी अणकुचीदार
तार गच्च बसविलेली असते. दुसऱ्या दांडीच्या टोकास पेन्सिल
बसविण्यासाठी पेन्सिलीच्या आकाराचे नळकांडे असून घट्ट अथवा
सैल करण्यासाठी स्क्रू बसविलेला असतो. काही कंपासांना अंतर
मोजण्यासाठी सें.मी. चे आकडे असलेली वक्र पट्टी वरच्या बाजूला
बसविलेली असते.</p>

<p>पान नं. 7</p>

<p>याचा उपयोग अर्धवर्तुळ , पूर्ण वर्तुळ काढण्यासाठी होतो. नळ-
कांडीत पेन्सिल गच्च बसविल्यानंतर हवे तितक्या त्रिज्येचे अंतर घ्यावे.
नंतर लोखंडी तारेचे टोक कागदात अथवा कापडात टोचावे म्हणजे
वर्तुळ काढताना कंपास सरकणार नाही. कंपासच्या वरील बाजूस
धरून पेन्सिलीचे टोक गोल फिरवावे म्हणजे वर्तुळ तयार होईल.</p>

<p>2. कर्कटक : याची सर्व रचना कंपाससारखीच असते. परंतु
यात दोन्ही टोकांना अणकुचीदार लोखंडी तार बसविलेली असते.
एका ठिकाणच्या अंतराइतके अंतर दुसऱ्या ठिकाणी घेण्यासाठी
किंवा रेषेचे सारखे भाग पाडण्यासाठी याचा उपयोग करतात.</p>

<p>3. त्रिकोणी गुण्ये :  ही काटकोन त्रिकोणी चपटी साधने
लाकडाची, प्लॅस्टिकची किंवा पत्र्याची असतात. यांपैकी एका
काटकोनाची एक बाजू लहान, तर दुसरी बाजू लांब असते. दोन्ही
बाजूंवर सें.मी. च्या खुणा व आकडे असतात. दुसरा गुण्या
समद्विभुज काटकोन त्रिकोण असतो. याचा उपयोग समांतर रेषा व
काटकोन काढण्यासाठी होतो.</p>

<p>4. पट्टी :  कंपासपेटीत 15 सें.मी. लांबीची पट्टी असते.
हिच्या एका बाजूस इंचाचे आकडे व दुसऱ्या बाजूस सें.मी. चे आकडे</p>

<p>पान नं. 8</p>

<p>व खुणा केलेल्या असतात. जास्त लांब रेघ आखण्यासाठी मोठी पट्टी
वापरतात. ही पट्टी 30 सें.मी. लांब असते. यावरील खुणा व
आकडे लहान पट्टीप्रमाणेच असतात. या पट्ट्या लाकडी, प्लॅस्टिक,
पत्र्याच्या किंवा पोलादी असतात.</p>

<p>5. कोनमापक :  हे अर्ध वर्तुळाकृती लाकडाचे, प्लॅस्टिकचे
अथवा पत्र्याचे असते. अर्धवर्तुळाकार बाह्यरेषेलगत कोन मोजण्या-
साठी 0 अंश ते 180 अंश पर्यत आकडे असतात. या अर्धवर्तुळाच्या
खालील सरळ भागाच्या बरोबर मध्यभागी एक बाणाकृती खूण असते.
कोन मोजतेवेळी अथवा कोन करतेवेळी कोनाच्या दोन रेषा
ज्या ठिकाणी मिळतात तेथे वर सांगितलेली मध्यबिंदूची खूण
कोनाच्या खालच्या बाजूच्या सरळ रेषेवर आली पाहिजे म्हणजे
कन बरोबर मोजता येईल किंवा तयार करता येईल.
कंपासपेटीमधील उपकरणांच्या साहाय्याने काटकोन, लघुकोन,
विशालकोन, निरनिराळे त्रिकोण, वर्तुळे, इत्यादी आकृत्या काढता
येतात. या भौमितिक आकृत्या एकमेकींत गुंफून सुरेख डिझाईन्स
तयार करता येतात.
भौमितिक डिझाईन व किनारी आकृत्यांत दाखविल्याप्रमाणे विविध
प्रकारे करता येतील.</p>

<p>पान नं. 9</p>

<p>रंगसंगती</p>

<p>रंगसंगतीचा विषय मोहक व आकर्षक आहे.
रंग म्हणजे काय ? रंग म्हणजे वस्तूंच्या पृष्ठभागावर अस-
लेल्या पटलांच्या अंगी प्रकाशकिरणातले विशिष्ट रंग आकर्षून घेऊन
बाकीचे बाहेर फेकण्याची एक विशिष्ट शक्ती असते. त्यासच रंग
म्हणतात. त्यामुळे निरनिराळ्या वस्तूंच्या निरनिराळ्या वैशिष्ट्या-
नुसार आपणास त्या ठिकाणी रंग दिसतात. रंगाचे आकलन होण्यास
आणि रंगसृष्टीची निर्मिती होण्यास प्रकाश व दृष्टी हे महत्त्वाचे
घटक आहेत. रंगामुळे वस्तूंतील फरक जाणता येतो. त्यामुळे मोठा
मानसिक आनंद मिळतो.</p>

<p>इतिहास : रंगशास्त्राच्या इतिहासाचा मानवाच्या सांस्कृतिक
उत्क्रांतीशी बराच निगडीत संबंध आहे. रानटी अवस्थेतून हळूहळू
सुसंस्कृततेकडे जात असताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांनुसार
व परिसरात सापडणाऱ्या पदार्थाच्या अनुषंगाने रंगशास्त्रात त्याने
प्रगती केली. अगदी सुरूवातीच्या काळात सहज उपलब्ध अशा
रंगीत मातीपासून मर्यादित रंगाविष्कार केलेला दिसून येतो. इतिहास-
पूर्व काळात गुहेतील चित्रे आणि तत्कालीन काही वस्तू या गोष्टीची
साक्ष देतात. त्यानंतर निरनिराळ्या खनिजांच्या व वनस्पतींच्याच
साह्याने निरनिराळ्या धातूंववर रासायनिक परिणाम करून अधिका-
धिक असे रंगसाम्राज्य मानव निर्माण करीत गेला. आजच्या शास्त्रीय
जगात तर हे रंगशास्त्र उत्कर्षाच्या शिगेस पोहोचलेले दिसून येते.</p>

<p>1. रंगसंगती :  भरतकामात रंगसंगती उत्कृष्ट साधावयास हवी.
उत्तम रंगसंगतीमुळे मनुष्याचे लक्ष आकर्षित होते. रंगसंगती
चांगली साधली नाही तर केलेल काम सुंदर दिसणार नाही व
कामाला उठावही येणार नाही. म्हणून सुंदर रंगसंगती साधण्याचा
प्रयत्न केला पाहिजे.</p>

<p>भरतकलेत रंगसंगती साधणे ही साधना आहे. डिझाईनमधील
रंगयोजना ही वैयक्तिक आवडीची बाब असली तरी ती नियमाला
अनुसरून केल्यास भरतकलेत आगळेच सौंदर्य निर्माण होईल.
यासाठी रंगसंगतीचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. रंगसंगती साधण्याची
पद्धत असते. निसर्गातील विविध रंगवस्तूंचे सूक्ष्म निरीक्षण करून
ती सहज हस्तगत करता येते. रंगसंगतीचे पाठ शिकण्यासाठी
निसर्गाएवढा मोठा दुसरा गुरू कोणीच नाही. त्याच्या जवळ रंग-
संगतीचे उत्तमोत्तम भांडार आहे.</p>

<p>डिझाईनमध्ये अमुक ठिकाणी अमुक रंग भरलाच पाहिजे असे
नाही. स्वतःच्या कल्पकतेप्रमाणे रंग भरता येतील. रंग वरचेवर
निरनिराळे बदलून भरल्याने रंगाची कल्पना येऊन नवी दृष्टी
लाभेल. पानाफुलांत नैसर्गिक रंगच भरले पाहिजेत असेही नाही.
अनैसर्गिक रंग वापरूनही उत्कृष्ट रंगसंगती साधता येते. डिझा-
ईनची रंगसंगतीही कापडाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असते.</p>

<p>प्रकार : 1 एकरंगी रंगसंगती
2. दुरंगी रंगसंगती
3. अनेकरंगी रंगसंगती
4. सजातीय रंगसंगती
5. विजातीय रंगसंगती</p>

<p>1. एकरंगी रंगसंगती :  यामध्ये अनेक प्रकार आहेत.
अ. यामध्ये पांढऱ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्याचा धाग्याने केलेले
भरतकाम.
ब. पार्श्वभूमीच्या कपड्याचा जो रंग असेल त्याच रंगात व
छटेत केलेले सर्व भरतकाम.
क. पार्श्वभूमीचा रंग कोणताही असला तरी त्यावर पांढऱ्याच
धाग्याने कलेले भरतकाम.
ड. कोणत्याही फिक्क्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळा किंवा
गडद रंग वापरून केलेल काम.</p>

<p>हे सर्व प्रकार एकरंगी रंगसंगतीत येतात. या रंगसंगतीचा
उपयोग कटवर्क (कातरकाम,) अँल्पीक वर्क, पंचवर्क(जाळीकाम),
शॅडोवर्क(छायाकाम) यामध्ये करतात.</p>

<p>2. दुरंगी रंगसंगती : यामध्ये कोणतेही दोन रंग वापरून
रंगसंगती साधली जाते. उदा- काळा-पिवळा, पांढरा-निळा, लाल-
पांढरा.</p>

<p>3. अनेकरंगी रंगसंगती : हा प्रकार विविध रंगसंगतीमध्ये येतो.
यात अनेक रंग वापरण्यास वाव असतो. ही रंगसंगती लोकांना
विशेष आवडते. त्याचा उद्देश पाहून निरनिराळे रंग व निरनिराळ्या
छटांचा उपयोग केला जातो. गर्द रंगाचे प्रमाण जास्त झाल्यास
थोडा फिक्का रंग वापरून तोल (Balance) सांभाळावा लागतो, तर
फकिक्या रंगात गर्द रंग वापरून विरोध निर्माण करून तोल साधावा
लागतो. पाने, फुले, आकृत्त्या व देखावे यांमध्ये ही रंगसंगती
उपयुक्त ठरते. डिझाईनमधील नैसर्गिकपणा, जिवंतपणा व रंगाच्या
बारीकसारीक छटा व छायाप्रकाश या रंगसंगतीत दाखविता येतो.</p>

<p>4. सजातीय रंगसंगती : यामध्ये एकाच वर्गातील (सर्वच
गडद रंग किंवा सर्वच फिक्के रंग) निरनिराळ्या रंगांच्या छटांचा
उपयोग करून डिझाईन केलेले असते.</p>

<p>पान नं. 10</p>

<p>5. विजातीय रंगसंगती : यात परस्पर विरोधी रंग (एक
गडद व दुसरा फिक्का रंग) किंवा मूळ रंगातील कोणतेही दोन
किंवा तीन रंग वापरून भरतकाम केलेल असते.</p>

<p>भाव-प्रगट दर्शन : रंग माणासाला आकर्षून घेतात. याचे प्रमुख
कारण रंगातून भाव प्रगट होतात. भाव प्रगट करणारी कला
अर्थातच ह्दयस्पर्शी होते. म्हणून रंग-सामर्थ्याचा विचार करणे
आवश्यक आहे.</p>

<p>रंगचक्राद्वारे रांगाची माहिती : तांबड्या रंगातून भीषणता,
उष्णता हे भाव प्रकट होतात. गुलाबी रंगातून प्रीती व माधुर्य
व्यक्त होते. नारिंगी रंगातून खेळकरपणा व आनंदी वृत्ती प्रगट
होते. हिरवा रंग चैतन्य व चिरंजीवित्व दर्शवितो. निळ्या रंगातून
वैभव व शांतता दिसून येते. पांढरा रंग पावित्र्याचे प्रतीक आहे.
काळा रंग निषेध अथवा दुःखाचे द्योतक आहे. पिवळ्या रंगाचा
प्रकाशासाठी उपयोग करतात.</p>

<p>रंगाचे गुण-विशेष लक्षात घेऊन त्याचा उपयोग निरनिराळ्या
कामी कसा करावा ते ठरविले पाहिजे. लहान मुलांसाठी करावयाच्या
कपड्यावर नारिंगी रंग वापरावा. तसेच टी-कोझी कव्हर, ट्रे क्लॉथ
यांतही नारिंगी रंग वापरावा. कारण यात आनंदी वृत्ती निर्माण करण्याचे
गुणधर्म आहेत.
बिछान्यावरील चादरीला किंवा उश्याचे अभ्रे व खिडक्यांचे
पडदे यांसाठी निळ्या रंगाची निवड करावी. कारण निळ्या रंगातून
शांततेचा भाव प्रगट होतो. टीसेट-डिनरसेट यासाठी पिवळे किंवा
गुलाबी रंग वापरावेत. युवकांच्या कपड्यांवर विशेषतः युवतींच्या
कपड्यांवर हिरव्या रंगाला प्राधान्य द्यावे. त्यांचे सौंदर्य अखंड
टिकावे, चिरंजीवी व्हावे अशा अपेक्षेने.
तसेच वयोमान व प्रसंगाचे औचित्य साधून रंगसंगतीचा विचार
करावा. लग्नसमारंभ, वाढदिवस या वेळी भडक सोनेरी, चंदेरी रंगाची
भरतकला योग्य दिसेल. नेहमी वापरण्यासाठी सौम्यरंगाची भरतकला
योग्य दिसेल. रंगसंगती प्रत्येकाने निरीक्षण करून व स्वतः विचार
करून अभ्यासावी. पार्श्वभूमीच्या कपड्यावर डिझाईनची रंगसंगती
अवलंबून असते. डिझाईनमधील आकार रंगसंगतीशी सुसंगत असावा.</p>

<p>सुया</p>

<p>सुई हे भरतकलेतील एक अतिशय नाजूक व प्रभावी असे
साधन आहे. भरतकामात लागणाऱ्या सुयांचे लांब, आखूड, बारीक,
जाड असे प्रकार असतात. त्यांचे जाडीनुसार वेगवेगळे नंबर
असतात. सुया वेगवेगळ्या धातूच्या म्हणजे पोलाद, लोखंड, ब्रांझ
व चांदीच्या असतात. भरतकाम करताना योग्य व चांगल्या सुया
वापराव्या. या सुयांमध्ये नंबर जसे जास्त तशा सुया बारीक व
लहान असतात. नंबर जसा कमी तशी सुई जाड व मोठी असते.
काही सुयांची नेढी गोल, काहींची बारीक तर काहींची चपटी
असतात. काही सुयांची टोके गोल असतात.
1. नंबरची सुई जाड असून 5 सें.मी. लांब असते. सुईचे नेढे
मोठे असते. सुईमध्ये लोकर अथवा जाड धागा सहज ओवता येतो.
यामुळे या सुईचा उपयोग गालीचे व जाळीच्या कापडावरचे काम कर-
ण्यास होतो. तसेच लोकरीचे कपडे शिवण्यास या सुईचा उपयोग होतो.
2,3,4 या नंबरच्या सुया साधारण लांब व क्रमाक्रमाने जाडीने
कमी झालेल्या असतात.
5 नंबरच्या सुईची लांबी 4 सें.मी. असून त्या सुईचे नेढे</p>

<p>पान नं. 11</p>

<p>जरा मोठे असते. या सुईचा उपयोग पंचवर्क (जाळीचे काम)
साठी करतात. 6,7,8 या सुया शिवण्यासाठी वापरतात. 6 व
7 नंबरच्या सुया काजे व बटण लावण्यासाठी वापरतात, तर 8
नंबरची सुई हातशिलाईसाठी वापरतात. या सुया आखूड असतात.
8 नंबरची सुई भरतकलेसाठी बुलीयन स्टिच (आळीच्या टाक्या-
साठी ) वापरतात.</p>

<p>9 व 10 नंबरच्या सुया बारीक असतात. क्रवेल स्टिचसाठी व
इतर टाक्यांसाठी या सुयांचा वापर केला जातो. 11 व 12 नंबरच्या
सुया अत्यंत बारीक असून लहान असतात. ह्या सुया बारीक तारे-
प्रमाणे लवचिक असतात. यांचा उपयोग मणीकाम करण्यासाठी होतो.</p>

<p>काही विशिष्ट कामाच्या सुया</p>

<p>1. टेनरीफची सुई : टेनरीफची एक गोल किंवा चौकोनी
आकाराची दाते असलेली प्लेट (तबकडी) असते. या प्लेटवर
फुले करतात. याची सुई पोलादी असून पुढील भागास वळलेली
असते. या सुईचे टोक गोल असल्यामुळे धागा चिरला जात नाही.
तसेच पुढील भाग वळलेला असल्यामुळे एका धाग्यातून दुसऱ्या
धाग्यात सुई जाताना त्रास होत नाही.</p>

<p>2. खेळणी शिवण्याची सुई :  ही सुई धनुष्याकृती असते.
त्यामुळे वळणारे आकार शिवण्यास कठीण जात नाही. सुयांच्या
आकतीतील 2 नंबरची सुई खेळणी शिवण्याची व रंगवर्कसाठी
वापरतात.</p>

<p>3. पंचवर्कची सुई :  अ- ही सुमारे 4 ते 5 सें.मी लांबीची
असते. नेढे मोठे असल्यामुळे टाके घालतानाच जाळी पडते. ही
सुई लोन वायल केंब्रिक कापडावर पंचवर्क करताना वापरतात. ब-
ही सुई चप़टी असून त्रिकोणी धारेची व मोठी असते. या सुईचा
उपयोग लिननसारख्या जाड कापडावर पंचवर्क करण्यासाठी होतो.</p>

<p>4. नेटची सुई : जाळीच्या कापडावर काम करण्यासाठी ही सुई
वापरतात. ही सुई मोठी असून नेढे मोठे असते व टोकाला गोल
असते. जाळीच्या कापडावर लेस, रूमाल, पडदे वगैरे करण्यासाठी
जाड धागा घेतात. हा धागा चटकन ओवता येतो तसेच जाळी चांगली
राहून सुई चटकन वर काढता यावी म्हणून या सुईचा उपयोग करतात.</p>

<p>5. वादलाची सुई :  या सुईची जाडी कमी असून नेढे मोठे
असते. नेढे मोठे असल्यामुळे बादला त्यात ओवता येतो. याचे
पुढील टोक थोडेसे गोल असते.</p>

<p>पान नं. 12</p>

<p>6. क्रोशे सुई : ही सुई इतर सुयांपेक्षा निराळी असून 10 ते
12 सें.मी. लांब असते. तिच्या टोकाशी हुकाप्रमाणे बाक आलेला
असतो. मध्यभागी ती चपटी असते. त्यावर नंबरचा आकडा असतो.
कामास सुरूवात करताना दोरा व सुईचा नंबर जुळेल असे घ्यावे.
लोकरीचे काम करण्यासाठी क्रोशे सुईप्रमाणेच जाड हुकाच्या
सुया असतात. याच्या साहाय्याने लोकरीचे विणकाम करतात. या
सुया 7 ते 11 क्रमांकापर्यत असतात. विणकामासाठी लागणाऱ्या
लोकरीच्या नंबरानुसार सुईची निवड करावी.</p>

<p>7. अरी सुई : ही सुई क्रोशे सुईसारखीच असते. सुईच्या
टोकापासून 1 ते 1 सें.मी. अंतरावर प्लॅस्टिक किंवा लाकडाचा
दांडा असतो. त्यामुळे सुई कापडात खोलवर जाऊ शकत नाही.
धाग्याच्या जाडीनुसार जुळेल अशा नंबरच्या सुया वापराव्या.</p>

<p>सुयांची निगा : 1) सुया गंजू नयेत म्हणून फेल्टचा
बदामाकृती आकार कापून घ्यावा व त्याला सुया टोचून ठेवाव्यात</p>

<p>2) बटर पेपरला व्हॅसलीन लावून त्याला सुया लावून
ठेवल्यास त्या चांगल्या राहतात.
3) सुया ठेवण्यासाठी डबी करावी. डबीला आतून खोबरेल
तेल लावावे. नंतर त्यात सुया ठेवाव्यात.
म्हणजे सुया गंजत नाहीत. सुईचा उपयोग करण्यापूर्वी चांगली
पुसून घ्यावी.</p>

<p>कात्री</p>

<p>सर्वसाधारण 5 प्रकारच्या कात्र्या असतात.
1) सरळ टोकाची मोठी कात्री
2) लहान कात्री
3) वळलेल्या टोकाची कात्री
4) काजे कर्तन कात्री
5) नागमोडी कात्री
कात्र्या-पोलादी, लोखंडी, स्टील व बिडाच्या असतात.</p>

<p>1. सरळ टोकाची मोठी कात्री : या कात्रीचा उपयोग कापड
कापण्यासाठी होतो. हिची लांबी 20 ते 30 सें.मी. असते.
हिला दोन गोल असून कापताना मोठ्या गोलात चार बोटे ठेवून
लहान गोलात अंगठा ठेवावा. या कात्रीची पाती जाड असतात व
घट्ट करण्यासाठी स्क्रू बसविलेला असता.</p>

<p>2, लहान कात्री :  या कात्रीची लांबी 12 ते 15 सें.मी. असते.
भरतकलेतील धागे कापण्यासाठी हिचा उपयोग होतो. कात्रीची पाती
लहान असतात. दोन्ही गोल सारखेच असतात. हिची टोके चांगली
धारदार असावीत. हिचा उपयोग कटवर्क व आयलेटवर्कसाठी होतो.</p>

<p>पान नं. 13</p>

<p>3. वळलेल्या टोकाची कात्री : या कात्रीची लांबी 12 ते
15 सें.मी. असून टोके पातळ व वळलेली असतात. हिचा उप-
योग कटवर्क व वळणाकृती आकार कापण्यासाठी होतो.</p>

<p>4. काजे कापण्याची कात्री : काजे कापण्यासाठी या कात्रीचा
उपयोग करतात हिची पाती जाड असतात. हीवर सें.मी. अथवा
इंचाच्या खुणा असतात. हिच्या पात्याशी स्क्रू बसविलेला असतो.
स्क्रू कमी जास्त केल्याने काज्याची लांबी लक्षात येऊन काजी
सारख्या मापाची कापता येतात.</p>

<p>5. नागमोडी कात्री : ही कात्री इतर सर्व कात्र्यांपेक्षा अगदी
निराळी आहे. हिची लांबी 20 ते 25 सें.मी असते व पाती
जाड असून त्यांच्या कडा नागमोडी असतात. हिने कापले
असता कड नागमोडी दिसते. कपड्यांची सुते निघूनयेत व
कडा शोभिवंत दिसाव्यात म्हणून ही कात्री वापरतात.</p>

<p>कात्रीची निगा : 1) कात्री खाली पडल्यास टोके खराब
होतात. यासाठी कात्रीच्या आकाराची पिशवी अथवा डबा करून
त्यात कात्री ठेवावी.
2) कात्रीची टोके बुचात घालावी म्हणजे कात्री खाली
पडली तरी टोके तुटणार नाहीत व वाकडी होणार नाहीत.
5) कात्री गंजू नये यासाठी ग्लिसरीन लावून ठेवावे.</p>

<p>भरतकलेची रिंग व कापड लावण्याची पद्धती</p>

<p>भरतकला करताना कापड ताठ राहावे यासाठी कापड निर-
निराळ्या प्रकारे ताणून लावण्याचे पुढील प्रकार आहेत.
1) रिंगमध्ये लावण्याची पद्धत.
2) चौकटीवर लावण्याची पद्धत.
3) खाटेसारख्या लांब चौकटीवर पट्टाय एकमेकींत घालून
कापड ताणून घेणे.
रिंग : रिंग अँल्युमिनियमची, लाकडाची व वेताची असते.
अ. साधी रिंग.
ब. बसक्या स्टॅडला लावलेली रिंग.
क. उभ्या स्टॅडला लावलेली रिंग.
ड. वेताची रिंग.
इ. अंडाकृती रिंग.
अ) साधी रिंग : ही रिंग 10 सें.मी. पासून 45 ते 50
सें.मी. व्यासाची असते. नेहमीच्या वापरासाठी 25 ते 30 सें.मी.
व्यासाची रिंग योग्य असते. रिंगमध्ये 2 गोल असतात. एक आतला
व दुसरा बाहेरचा गोल. बाहेरच्या गोलास सैल अगर घट्ट करता यावे
यासाठी लोखंडी अथवा पितळी स्क्रू असतो. त्याच्या साहाय्याने
कापड घट्ट ताणता येते. रिंगची जाडी 1 ते 2 सें.मी. असते.</p>

<p>1. रिंगमध्ये कापड लावण्याची पद्धत :  कापडावर काढलेल्या
डिझाईनच्या खालच्या बाजूस रिंगमधील लहान गोल ठेवावा. नंतर
कापडाच्या वरील बाजूस मोठा गोल ठेवावा. मग मोठा गोल सर्व
बाजूंनी लहान गोलावर दाबावा म्हणजे कापड घट्ट बसते. ही क्रिया
करीत असताना सर्व बाजूंनी कापड हळूहळू ताणून घ्यावे. मग स्क्रू
घट्ट करावा. म्हणजे कापड ताणलेल्या स्थितीत घट्ट राहील. कापड ताठ
झाल्यामुळे टाके एकसारखे येतील. रिंग काढतेवेळी स्क्रू सैल करावा.
म्हणजे बाहेरचा गोल मोठा होऊन कापड काढण्यास सुलभ होईल !</p>

<p>पान नं. 14</p>

<p>रिंगमध्ये कापड लावताना घ्यावयाची दक्षता:
अ) डिझाईन बरोबर रिंगमध्ये असावे.
ब) भरतकला केलेल्या जागी स्क्रू येऊ नये. त्यात धागे
अडकण्याचा संभव असतो.
क) कापड एकदम ओढून घेऊ नये. एकदम ओढल्यामुळे
कापड फाटण्याची शक्यता असते. सर्व बाजूंनी सारखे ओढून
घेऊन मग स्क्रू घट्ट करावा.
ड) वायल, मलमल, जॉर्जेट, नायलॉन अशा प्रकारचे कापड
ताणताना वेताच्या रिंगचा उपयोग करावा किंवा लाकडी रिंगच्या
आतील गोलव्याला पातळ कापडाची पट्टी गुंडाळून घ्यावी. नंतर
मूळ कापड त्यावर ठेवून बाहेरील गोल बसवावा सावकाश
कापड ओढून घ्यावे. म्हणजे कापडाची सुते ओढली जाणार नाहीत
व कापडाचा आकार बिघडणार नाही.</p>

<p>ब) बसक्या स्टँडला लावलेली रिंग : या प्रकारात साध्या
रिंगप्रमाणेच रिंग असते. मात्र ही रिंग एका बसक्या स्टँडला
स्क्रूच्या साहाय्याने जोडलेली असते. ह्या प्रकारच्या रिंगमुळे
दोन्ही हात मोकळे राहून भरतकाम करता येते. त्याचप्रमाणे
पाहिजे तशी रिंग फिरवून घेता येते. हा स्टँड टेबलावर किंवा
जमिनीवर ठेवून भरतकाम करता येते.</p>

<p>क) उभ्या स्टँडला लावलेली रिंग :  ह्याची बरीचशी रचना
`ब' मध्ये सांगितल्याप्रमाणे आहे. पण स्टँड उभा असतो. ह्या
स्टँडमध्ये उंची कमी-जास्त करण्याची सोय असते. बसक्या स्टँड
प्रमाणेच त्याचा उपयोग होतो.
ड) वेताची रिंग : जरी भरतकामासाठी वापरावी. वेताची
असल्यामुळे नाजूक कापड फाटत नाही,
इ) अंडाकृती रिंग : उभट आकाराचे डिझाईन भरण्यासाठी
हिचा उपयोग होतो. हिची रचना `अ' मध्ये सांगितल्याप्रमाणेच
असते. फक्त आकार अंडाकृती लंबवर्तुळाकार असतो.</p>

<p>चेन स्टिच, बटनहोल स्टिच, बुलीयन स्टिच, स्टेम स्टिच,
रिंगशिवायही भरता येतात. काही भरतकामातील टक्यांसाठी रिंग
वापरणे सोईचे आहे. क्रूवेल स्टिच व इतर टाके भरताना चुणा पडू
नये व अंतर सारखे यावे म्हणून रिंगची अत्यंत आवश्यकता आहे.</p>

<p>2. चौकटीवर कापड लावण्याची पद्धत नं.1 :  चौकट
लाकडाची असते. त्याच्या पट्ट्या एकमेकींत अडकविलेल्या असतात.
देखावे व मोठ्या आकृत्या भरताना या चौकटीचा वापर करावा.
कृती : जाड कापडाची दुहेरी अथवा तिहेरी घडी करून लांब
पट्टी शिवून घ्यावी. नंतर यावर दर 8 सें.मी. अंतरावर काजे
करून घ्यावे. केलेली पट्टी देखाव्याच्या कापडास पुरेल इतकी लांब</p>

<p>पान नं. 15</p>

<p>असावी. ती देखाव्याच्या कापडास चारी बाजूंनी शिवावी. शिवताना
कोपऱ्यात दुमडून कोपरा बरोबर येईल तसेच कापडास चूण न
पडेल याची दक्षता घ्यावी. लांब जाड दोरी घेऊन चौकटीच्या एका
कोपऱ्यात बांधून घ्यावी. दोरीचे दुसरे टोक काज्यामधून काढून
चौकटीवरून फिरवून परत काज्यात घालावे. याप्रमाणे सर्व काज्या-
मधून करीत जावे(आकृती पाहा) दोरी गच्च ओढून घ्यावी. असे
बांधत आल्यावर पहिल्या गाठीजवळ दोरीचे शेवटचे टोक बांधावे.
पितळी किंवा अँल्युमिनियमच्या रिंग्ज अंतराअंतरावर बसवि-
लेल्या कापडी पट्टाय मिळतात. या पट्ट्यांचा उपयोग काजे पट्ट्यांच्या
ऐवजी करतात. कापड लावण्याची व ताणण्याची पद्धत वरील-
प्रमाणेच आहे.</p>

<p>चौकटीवर कापड लावण्याची पद्धत नं. 2 :  चौकटीमध्ये
पट्टा काटकोनात जोडलेल्या असतात. उदा. पाटीच्या चौ        कटी-
सारखी असते.
कृती : या पद्धतीत कापड जास्त लागते. कापडावर डिझाईन
छापून घेतल्यानंतर कापड लाकडी चौकटीवर ठेवावे. 2 सें.मी.
रूंदीची कापडी जाड पट्टी चौकटीच्या कडेने धरून अंतराअंतरावर
चुका ठोकून घ्याव्या, प्रथम एक बाजू ठोकून घ्यावी, त्यानंतर
कापड नीट ताणून घेऊन चौकटीच्या समोरची बाजू ताणून घ्यावी.
मग तिसरी बाजू ताणावी. चौथी बाजू ताणाताना कापड सैल व चूण
पडणार नाही अशी दक्षता घेऊन ताणावी. या चौकटीचा उपयोग
देखावे भरण्यासाठी होतो.</p>

<p>चौकटीवर कापड लावण्याची पद्धत नं. 3 : ही चौकटही
1 नंबरच्या चौकटीसारखीच असते. ह्याच्या चारही पट्ट्या सुट्या
होऊ शकतात. ह्यात कमी लांबीच्या समोरासमोरच्या पट्टाय असतात.
त्यास छिद्रे असतात व ज्या जास्त लांबीच्या समोरासमोरच्या पट्ट्या
असतात त्याला स्क्रु असतो. त्यामुळे पाहिजे त्याप्रमाणे चौकट
लहान-मोठी करता येते. स्क्रू छिद्रांमध्ये पाहिजे त्या अंतरावर पिळावे.
पट्ट्यांच्या बाजूस कापड गुंडाळून ठेवण्यास रूळ असतो.
आकृतीत दाखविल्याप्रमाणे कापड दोन बाजूंनी 1 नंबरच्या
पद्धतीप्रमाणे ताणून घ्यावे. ह्या चौकटीवर स्कर्ट बॉर्डर किंवा साडी
बॉर्डर याप्रमाणे लांब डिझाईन भरण्यास सुलभ जाते. कारण ह्यास
दोन्ही बाजूंस रूळ असल्यामुळे भरलेले डिझाईन एका बाजूस व
भरावयाचे डिझाईन दुसऱ्या बाजूंस गुंडाळून ठेवता येते.</p>

<p>3. खाटेसारखी चौकट :  यात दोन प्रकार आहेत.</p>

<p>अ) या चौकटीचा उपयोग मुख्यतः साड्या भरण्यासाठी
होतो. या चौकटी बसक्या व उभ्या स्टँडच्या असतात. उभ्या
स्टँडमध्ये उंची कमी-जास्त करता यावी अशी रचना असते.</p>

<p>पान नं. 16</p>

<p>ही चौकट आयताकृती असते. यात अरूंद बाजूकडे समोरा-
समोर दोन चपट्या पट्ट्या असतात. त्यांवर लहान लहान छिद्रे
असतात. त्यातून दोरी घालून साडी ताणून घ्यावी लागते. (चौकटी
वर कापड ताणण्याच्या पद्धतीप्रमाणे) दुसऱ्या दोन लांब बाजूस
भरलेली साडी व भरवायची साडी गुंडाळण्यासाठी समोरासमोर
लाकडी रूळ (गोलदांडी) असतात.
ब) यामध्ये चौकट लहान असते. यातील चारीही पट्टया सुट्या
असतात. बाकीची सर्व रचना वरीलप्रमाणेच असते. याट पट्टाय सुट्या
असल्यामुळे चौकट पाहिजे तेवढी लहान किंवा मोठी करता येते.
अशा प्रकारच्या चौकटीवर साडीचे भरतकाम फार जलद होते.</p>

<p>कापड</p>

<p>भरतकला शिकताना निरनिराळ्या कापडांची जरूरी असते. यासाठी
सर्व प्रकारच्या कापडाची माहिती असणे आवश्यक आहे. भरतकाम
करण्यासाठी अनुरूप अशा कापडाची निवड करावी. कापड चांगले
असेल तर स्वाभाविकच कामही चांगले करण्याची स्फूर्ती येते. चांगल्या
कापडावर केलेल काम उठावदार दिसते. कापडाच्या निवडीला भरत-
कलेत महत्त्वाचे स्थान आहे. भरतकलेसाठी पुढील कापड वापरावे.
1) लॉगक्लॉथ (हरक) :  हे कापड पांढरे असून यात
हलके व भारी, साधे व मर्सराईज्ड असे प्रकार असतात. हरकचा
पन्हा 76 सें.मी. पासून 150 सें.मी. पर्यत असतो.</p>

<p>वरील कापडावर स्टेम स्टिच, चेन स्टिच, व्हीप्ड्, रनिंग, लेझीडेझी
स्टिच, रोप स्टिच यांसारख्या प्राथमिक स्वरूपाच्या टाक्यांनी
भरतकाम करता येते.</p>

<p>2) पॉपलीन :  हे चांगल्या प्रतीचे असते. यातही साधे व
मर्सराइज्ड असे प्रकार आहेत. हे कापड पांढरे व रंगीत असते.
यात एकेरी यार्न व दुहेरी यार्न असे प्रकार आहेत. एकेरी यार्नचे
पॉपलीन पातळ असून भरतकामासाठी चांगले असते. दुहेरी यार्नचे
पॉपलीन जाड असते यामध्ये सँटिन पॉपलीन असाही एक प्रकार
आहे. कापडाच्या एका बाजूस सँटिनप्रमाणे चकचकीतपणा असतो.
दुसरी बाजू साधी पॉपलीनप्रमाणे असते.</p>

<p>पॉपलीनवर बहुतेक सर्व टाक्यांचे भरतकाम करता येते. दाट
विणीच्या पॉपलीनवर आयलेट, कटवर्क, नेटवर्क, अँल्पीलकवर्क
भरता येते.</p>

<p>सँटिन पॉपलीनवर सर्व प्रकारचे भरतकाम उठून दिसते. हे झीग,
मणी, मोती, टिकल्या इत्यादी सुशोभित भरतकाम करण्यास वापरावे.
3. केसमेंट : हे कापड जाड असते. सुते सरळ असतात.
हे कापड अनेक रंगात मिळते. याचा पन्हा 90 सें.मी. पासून
150 सें.मी. असतो. या कापडावर पंचवर्क व सुते काढून
भरतकाम करता येते.
4. लिनन :  हे कापड ताग व कृत्रिम रेशीम अशा दोन
प्रकारच्या धाग्यांच्या मिश्रणाने तयार केलेले असते. याचा पन्हा
76 सें.मी. ते 115 सें.मी. असतो. यामध्ये आर्ट लिनन, रेयॉन
लिनन, सिल्क लिनन असे प्रकार आहेत. आर्ट लिनन व सिल्क
लिनन पातळ व मऊ असते. यावर लेझीडेझी स्टिच, चेन स्टिच
यांसारख्या प्राथमिक टाक्यांचे भरतकाम करतात. सिल्क लिननमध्ये
सल्क फिनिशिंग असते. रेयॉन लिनन थोडे जाड असते. या
कापडाची सुते काढून पंचवर्क ड्रॉन थ्रेडवर्क करतात,
5) खादी :   हे कापड जाडेभरडे तसेच तलम सुताचे आणि
अनेक रंगांचे असते. त्याचा पन्हा 76 सें.मी. असतो. भडक रंगाच्या
खादीवर अबला, कच्छी भरतकाम व सुते मोजता येत असल्यामुळे
कर्नाटकी कशिदा, ट्रॉन थ्रेडवर्क या टाक्यांनी भरतकामे करतात.
6) मॅटी :  कापड जाड असून याची वीण आखलेल्या
चौकोनाप्रमाणे असते. याची सुते सहज मोडता येतात. यात अनेक
रंग आढळतात. कशिदा शिकणाऱ्यासाठी हे कापड योग्य. या
कापडावर ड्रॉन थ्रेडवर्क (असीसी वर्क), व पार्श्वभूमीवर फलीच्या
टाक्यांनी भरतात.
7) टेनिस :  या कापडाची वीण बारीक सुताची असते.
शिवाय मॅटीप्रमाणेच आखलेल्या चौकटी असतात. त्यामुळे त्यावर
क्रॉसस्टिच व कशिदा भरता येतो. याचा पन्हा 76 सें.मी. ते
90 सें.मी. असतो.
8) सॅटिन :  सॅटिन कापडाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या
प्रकारच्या कापडात दोन्ही बाजू चकचकीत असतात. यावर भरतकला</p>

<p>
पान नं. 17</p>

<p>करू नये. दुसऱ्या प्रकारच्या कापडात कापडाचा पृष्ठभाग चकचकीत
असून मागील बाजू साधी असते. भरतकलेसाठी हे सॅटिन वापरावे.
यात भारी प्रतीचे व हलक्या प्रतीचे असे प्रकार आढळतात. याचा
पन्हा 76 सें.मी. ते 105 सें.मी. असतो. भरतकामासाठी दाट
विणीचे वापरावे.
या कापडावर बीड वर्क, झीग वर्क, टिकल्यांचे भरतकाम करतात.
9) टफेटा : हे कापड कृत्रिम रेशमी कापडापैकी आहे. इतर
रेशमी कापडांपेक्षा या कापडात जास्त कडकपणा असून त्यात
चकचकीतपणा असतो. याचा पन्हा 76 सें.मी. पासून 90 सें.मी.
असतो. यात अनेक रंग आढळतात. भरतकलेतील सर्व प्रकारचे टाके
यावर भरता येतात.
10) क्रेपसिल्क : हे कापड अनेक रंगांत मिळते. याला
चमक असते.यावर सर्व प्रकारच्या टाक्यांचे भरतकाम करता येते.
11.) व्हेलवेट (मखमल) : या कापडास चमक असते
दर्शन बाजूवर बारीक मऊ लुसलुशीत तंतू असतात. मागील बाजू
साधी असते. यात दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात वीण घट्ट
असते. दुसऱ्या प्रकारात विरळ वीण असते. हे कापड सर्व रंगांत
मिळते. याचा पन्हा 90 ते 120 सें.मी. असतो. घट्ट विणीच्या
कापडावर मोती, झीग, जर, मणी, टिकल्या वापरून, पर्स, बटवे,
टोप्या, जँकीट, कोट, झुली अशा प्रकारच्या सुंदर सुशोभित वस्तू
तयार करता येतात.
12) निनॉन :  हे कापड कृत्रिम रेशमी कापडापैकी अत्यंत
तलम वायलसारखे पातळ, मऊ व पारदर्शक असते. यात अनेक
प्रकार असून अनेक रंग असतात. याचा पन्हा 12 सें.मी. पासून
154 सें.मी. पर्यत असतो. कापड पारदर्शक असल्यामुळे शॅडोवर्क
तसेच जरी भरतकाम, बादला व टिकल्या यांचे भरतकाम करतात.
विशेषतः साड्यांसाठी याचा उपयोग करतात.
13)जॉर्जेट : हे कापड रेशमी असते. यात दोन प्रकार
आढळतात. 1) क्रिंकल जॉर्जेट 2) सुपीरिअर (तलम)
जॉर्जेट. क्रिंकल जॉर्जेट चुरगळल्यासारखे दिसत असल्यामुळे भरत-
कलेसाठी हे कापड वापरू नये. दुसऱ्या प्रकारच्या जॉर्जेटवर
शॅडोवर्क, जरी भरतकाम, टिकल्याचे व बादलाचे भरतकाम यावर
करतात. तसेच भरतकलेतील लेझीडेझी, सँटिन क्रूवेल, वगैरे
भरतकाम करतात. विशेषेकरून याच्या साड्या जास्त प्रमाणात
पाहावयास मिळतात.
14. नायलॉन :  यात पातळ नायलॉन व जाड नायलॉन
तसा असे प्रकार आहेत.पन्हा 90 ते 154 सें.मी. असतो. पातळ
नायलॉनच्या साड्यांवर जरीचे भरतकाम, शॅडोवर्क करतात. जाड
नायलॉनचा उपयोग भरतकाम व कपडे शिवण्यासाठी होतो.
15) ऑरगंडी : हे कापड तलम कापडात उच्च प्रतीचे
समजले जाते. यामध्ये अनेक रंग असतात. हे कापड पारदर्शक
असते. तसेच यात कडकपणा असतो. याचा पन्हा 92 सें.मी. ते
125 सें.मी. असतो. त्यावर शॅडावर्क, पंचवर्क व भरतकामातील
इतर टाक्यांनी भरतकाम करता येते.
16 लोन : हे कापड अनेक रंगांत आढळते. याचा पन्हा
90 सें.मी. ते 125 सें.मी. असतो. हे कापड ऑरगंडीइतके
पारदर्शक व कडक नसते. त्यावर पंचवर्क, स्टेम स्टिच, चेन स्टिच,
लेझीडेझी स्टिच व लखनौ चिकनकारी भरतकाम करतात.
17. वायल : हे कापड बारीक व तलम सुताचे असते. पांढऱ्या
व अनेक रंगांत हे कापड मिळते. वायल पारदर्शक असते. याचा
पन्हा 92. सें.मी ते 140 सें.मी. असतो. वायलमध्ये फुलवायल
तलम असते. याचा पन्हाही भरपूर असतो. याची वीण दाट असते.
वायलच्या साड्यांवर पंचवर्क, शँडोवर्क, लेझीडेझी स्टिच, रोप स्टिच,
फ्लाय स्टिच या प्राथमिक स्वरूपाच्या टाक्यांचे भरतकाम करतात.
18. टू बाय टू : लोकप्रिय असलेले हे कापड तलम असते.
यात अनेक रंग असतात. पन्हा 92 सें.मी. ते 140 सें.मी.
असतो. ह्या कापडावर सर्व प्रकारचे भरतकाम करता येते.</p>

<p>2
|  अ            |  भरतकलेचा प्रकार                                                      |       कापड                                                    |
|  1.           |   लेझीडेझी, चेन स्टिच, स्टेम स्टिच                                                    |   लॉगक्लॉथ टू बाय टू,                                                         |
|               |                                                       |       टेरीकॉट पॉपलीन, सँटिन                                                   |
|  2.                   |   अँप्लीक वर्क, नेटवर्क, सँटिन                                                        |       पॉपलीन, केंसमेट, टफेटा.                                                 |
|               |       स्टिच,क्रूवेल कटवर्क                                            |       सँटिन                                                   |
|  3.           |       कच्छी, आरसेकाम, फुलकारी                                         |    खादी भडक रंगाचे हात-                                                               |
|               |                                                       |       मागाचे कापड                                                     |
|  4.           |       कर्नाटकी कशिदा, क्रॉस स्टिच                                             |       मॅटी,टेनीस चौकटीचे                                                      |
|               |                                                       |       कँनव्हस, हातमागाचे कापड                                                 |
|  5.           |       पंचवर्क, शँडोवर्क                                               |       लोन, केबंरिंक, वायल,                                                    |
|               |                                                       |       ऑरगंडी                                                  |
|  6.                   |   जरीकाम, टिकल्या व बादला काम                                                 |       जॉर्जेट, नायलॉन                                                 |
|               |                                                       |       ऑरंगडी  , व्हेलवेट                                              |
|  7.           |       ड्रॉन थ्रेडवर्क                                         |       लिनन, मॅटी,                                                     |
|               |                                                       |       हातमागाचे कापड                                                  |
2|             |                                                       |                                                               |</p>

<p>पान नं. 18</p>

<p>भरतकलेचे धागे</p>

<p>भरतकलेच्या इतर सर्व साहित्यांत धाग्यांना फार महत्त्व आहे.
धाग्याच्या निवडीवर कामाचा दर्जा बराचसा अवलंबून असतो.
भरतकेलत एकंदर चार प्रकारच्या धाग्यांचा वापर केला जातो.
1) मर्सराईज्ड कॉटन (तलम सुती धागे)
2) रेशमी धागे
3) लोकर
4) जर व काही धातूंचे धागे
धागे उपयोगात आणताना उपयुक्तता व व्यावहारिक दृष्टी
यांचा विचार करून धागे वापरावेत.
लिनन पॉपलीन यासारख्या कापडावर भरतकाम करताना मर्सरा-
ईज्ड कॉटन वापरावे. रेशमी कापडावर भरतकाम करताना रेशमी
धाग्याचा उपयोग करावा. गरम कापडावर भरतकाम करताना लोक-
रीचा वापर करावा. मखमल, सॅटिन यावर भरतकाम करताना
जरीच्या धाग्याचा उपयोग करावा.</p>

<p>मर्सराईज्ड कॉटन (तलम सुती धागे) : बाजारात निर-
निराळ्या कंपन्यांचे धागे मिळतात. क्लार्क - डि.एम्.सी, कोहिनूर
आय्.एम्.सी. मोदी कंपनी वगैरे. यांमध्ये एकतारी असलेले बॉल
(गुंडे) असतात. तसेच सहा पदरी धाग्यांच्या लड्या व बॉल
असतात. लड्यांवर व बॉलवर नंबर असतात. या शडेड लड्यांत
फिक्यापासून गडद रंगापर्यत, परत गडदपासून फिक्या रंगापर्यतअशी एकच
छटा सलग धाग्यात असतात. तसेच प्लेन (एकरंगी)
लड्या असतात. सर्वसाधारण वापरासाठी क्लार्क कंपनीचे व मोदी
कंपनीचे रेशीम वापरावे. कारण हे धागे पक्क्या रंगाचे व टिकाऊ
असतात. त्याची चमक कमी होत नाही. लड्यांवर कागदी
क्रमांकाचे वेष्टण असल्यामुळे लड संपली तर त्या क्रमांकाचा धागा
मिळू शकतो. लड्यांमध्ये क्रमवार रंगाच्या छंटाचा उपयोग देखावे,
मिक्सिंग असे छटायुक्त भरतकला करताना होतो. त्यामुळे आपल्याला
रंगीत चित्राप्रमाणे हव्या त्या छटा साधता येतात.</p>

<p>सहा पदरी धाग्याचा बॉल : याचा उपयोग जाळीच्या कापडा-
वर (नेटवर) साडीचे काठ, पडदे रूमाल वगैरे करताना होतो.</p>

<p>एकतारी धाग्याचा बॉल : एकतारी धाग्याच उपयोग सुते
काढून केलेले काम ड्रॉन थ्रेडवर्क, चेन स्टिच, क्रॉस स्टिच, गालीचा,
टॉवेलच्या पिशव्या, पडदे वगैरे करताना करतात. क्लार्क कंपनीने
गोल गुंडे असतात. त्यावर धाग्याच्या जाडीप्रमाणे क्रमांक दिलेले
असतात. ते क्रमांक 10 पासून 5-60 पर्यत असतात.
क्रमांक जसा जास्त तसा धागा बारीक असतो व क्रमांक जसा कमी
धागा जाड असतो. हा धागा पिळदार व पक्का असून त्यास चकाकी
असते. क्रमांक 10 ते 4 क्रमांक 40 पर्यतचे धागे क्रोशे विणकाम,
टॅटीनवर्क यासाठी वापरतात, तर क्रमांक 50-60 हे मशिन
भरतकलेसाठी वापरतात.</p>

<p>रेशमी धागे :  सिफॉन एक्सेल्ला, सिल्व्हर इत्यादी कंपनीचे
धागे बाजारात मिळतात. त्यांचा उपयोग रेशमी कपड्यावर भरण्या-
साठी करतात. वरचेवर धुण्याचा प्रसंग येत नाही असे कपडे
भरण्यास या रेशमी धाग्याचा उपयोग करावा. याच्याही प्लेन
(एकरंगी) व शेडेड (छटायुक्त) लड्या मिळतात. यावर कागदी
क्रमांकाचे वेष्टण लावलेले असते. सिफॉनची शिवण्याच्या दोऱ्या-
प्रमाणे लांबट रिळे मिळतात. यांचा उपयोग मशीन भरतकलेसाठी
करतात.</p>

<p>धागे वापरण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :
1) धागे पक्क्या रंगाचे आहेत, याची खात्री करून मगच
वापरावे.
2) तसेच ते पक्क्या सुताचे आहेत का हे पाहून घ्यावे. धागे
पक्क्या सुताचे नसल्यास भरतकाम करताना धागा वारंवार तुटतो व
कामात अडथळा येतो.
3) धागे कापडाच्या रंगास व पोतास अनुकूल असे वापरावेत.</p>

<p>धागे व्यवस्थित ठेवण्याच्या पद्धती :
1) प्रथम शेडेड लड उलगडून घ्यावी. फिक्क्या छटेजवळ
फिक्की छटा येईल, असे सर्व पदर लावून घ्यावे. म्हणजे एक बाजू
संपूर्ण फिक्की व दुसरी बाजू गडद येईल. याप्रमाणे करून घेतल्या-
नंतर लडीचा कागदी क्रमांक पिनेच्या साहाय्याने लडीवर घालावा.
नंतर दोन्ही कडा फिक्क्या बाजूच्या गडद बाजूच्या मध्यावर
कापाव्यात. त्यांची वेणी घालावी. लडीच्या आकाराच्या लांबट</p>

<p>पान नं. 19</p>

<p>डब्यात लड्या ठेवाव्यात. याच पद्दतीने एकरंगी लडीच्या वेण्या
फिक्क्यापासून गडद छटांच्या लड्या कापून ठेवाव्या.
2) सुमारे 50 सें.मी. लांब व 25 सें.मी रूंद असे
दुहेरी कापड घ्यावे, यावर 2 सें.मी. अंतर ठेवून (मशिन शिवण)
उभ्या ओळी शिवून घ्याव्यात, उभ्या पोकळीत पीनच्या साह्याने वेणी
घातलेल्या लड्या सरकवून ठेवाव्यात. लडीवर क्रमांक असावा.
याप्रमाणे लड्या ठेवल्या असता मळत नाहीत व त्यांची चकाकी कमी
होत नाही. लड्या व्यवस्थित राहतात. यास लड्यांची गादी म्हणतात.
3) दोन तीन घड्या करता येईल असे पुठ्याचे पँड घ्यावे.
यावर एक सें.मी. रूंदीची इलॅस्टिक ताणून पिन्सच्या साहाय्याने
अथवा टिपेच्या टाक्यांनी घट्ट शिवावे. नंतर 16 सें.मी अंतरावर
याच रूंदीचे इलॅस्टिक ताणून लावावे. अशा रीतीने लावलेल्या
इलॅस्टिकमध्ये लड्या ठेवाव्यात. म्हणजे लड्या व्यवस्थित राहतील.
4) लडीच्या मापापेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या प्लॅस्टिक-
च्या पिशव्या घ्याव्यात, त्यात एकाखाली एक अशा क्रमवार
लड्या (एकाच छटेच्या) ठेवाव्यात. पिशव्या पारदर्शक असल्या-
मुळे रंग व क्रमांक चटकन दिसतात. व त्यानुसार धागा लागेल
तेव्हा घेता येतो. अशा निरनिराळ्या रंगांच्या दाग्यांच्या पिशव्या
करून डब्यात ठेवाव्यात. रेशमी लड्या वरीलप्रमाणेच ठेवाव्यात.</p>

<p>लोकर : लोकरीने विणकाम व भरतकाम करतात. लोकर जाड
असल्यामुळे भरतकाम लवकर होते. लोकरीचे काम करताना
प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून काम करावे. विणलेला कपडा वारंवार
उन्हात घालावा म्हणजे लोकरीला कसर लागणार नाही. लोकरीचे
गुंडे व लड्या 25 ग्रॅम वजनाच्या असतात. लोकर बऱ्याच कंप-
न्यांची बाजारात मिळते. लोकर पक्क्या रंगाची व चांगली वापरावी.
म्हणजे विणलेला कपडा सुंदर दिसेल. लोकर चांगली रहावी म्हणून
स्वतंत्र डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवावी.</p>

<p>जरीच्या धातूची माहिती : जरी धातूच्या वेगवेगळ्या
प्रकारच्या वस्तू खऱ्या व खोट्या आढळतात. कामाचे स्वरूप व
दर्जा बघून योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा.</p>

<p>भारताच्या वैभवाच्या काळात भरतकलेत मौल्यवान हिरे, माणके
टिकल्यास मोती झीग खरे वापरले जात. उंची वस्तू महाग झाल्या
त्याऐवजी नकली मोती, गोटा, टिकल्या, झीग जरीचे धागे, काचा,
वापरल्या जातात.
सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या टिकल्या, जर,पाने,फुले, अशा
वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आढळतात. सोने,चांदी,धातूचे धागे
याचा परिस्थिती व वस्तूची उपयुकत्ता पाहून उपयोग करावा. वरील
वस्तू वापरून सुंदर भरतकाम करता येते.</p>

<p>वरील जरी धातूचे प्रकार विकत घेताना खरी व खोटी पाहून
घ्यावी. खरी जर वजनात हलकी असते. जरीच्या वस्तू पाटीवर
घासून पाहावे. खोटी असल्यास जर काही काळाने काळी पडते.
जर : रेशमी धाग्यावर जर लावलेली असते. ही सोनेरी व रूपेरी
असते. त्याच्या लड्या व रिळे मिळतात.
झीग : सोनेरी व रूपेरी असते. झीग पोकळ व स्प्रिंगप्रमाणे
ताणली जाते. खरी झीग बारीक तर खोटी झीग जाड असते.
सलमा: सलमा झीगप्रमाणेच सोनेरी व रूपेरी असून पोकळ
असते. त्याचा स्पर्श मऊ असतो.</p>

<p>पान नं. 20</p>

<p>कंगरी : सोनेरी व रूपेरी असून ताठ व वजनाला झीग व
सलमापेक्षा जड असते.
बादला : सोनेरी, रूपेरी व चपटी बारीक तार असते.
टिकल्या: सोनेरी, रूपेरी व प्लॅस्टिकच्या लहान-मोठ्या
आकाराच्या गोल चपट्या व खोलगट असतात.
गोट : चंदेरी व सोनेरी अर्धा सें.मी. पर्यत
रूंदीची सरळ पट्टी असते. त्यापासून वेगवेगळ्या आकाराची फुले,
पाने, किनारी करतात.
मणी : लहान व मोठ्या आकाराचे मिळतात. मणी वेगवेगळ्या
रंगाचे साधे व चकाकणारे असतात.
मोती : लहान व मोठ्या आकाराचे खरे व खोटे बाजारात
मिळतात.</p>

<p>डिझाईन (रचनाचित्र) छापण्याच्या पद्धती</p>

<p>व्याख्या : निसर्गातील ज्या गोष्टी पाहून मनाला आनंद होतो
त्या गोष्टींचा आकाराचा उपयोग करून स्वतःची बुद्धी वापरून
त्याची कलात्मक रचना केली म्हणजे त्याला रचनाचित्र (डिझाईन)
म्हणता येईल. भरतकलेत रचनाचित्राला अत्यंत महत्त्व आहे.</p>

<p>कापडावर डिझाईन चांगल्या प्रकारे छापले असेल तर भरताना
उल्हास वाटतो व कामही चांगले होते. कापडावर डिझाईन व्यवस-
स्थित व चांगले काढता येणे ही भरतकलेची पहिली पायरी होय.
ज्यांना चित्रकलेचे ज्ञान चांगेल आहे त्यांनी स्वहस्ते कापडावर
उत्तम डिझाईन काढावे. ज्यांना चित्रकलेचे ज्ञान नाही परंतु कापडा-
वर डिझाईनची आवश्यकता आहे. अशा वेळेला डिझाईन छापावे
लागते. डिझाईन छापण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्याची माहिती
असणे जरूरीचे आहे.</p>

<p>प्रकार 1 : कार्बनच्या साहाय्याने डिझाईन छापणे : बाजारात
अनेक प्रकारची डिझाईन मिळतात. योग्य ते डिझाईन घ्यावे. प्रथम
ज्या कापडावर भरतकाम करावयाचे आहे त्यावर डिझाईनची जागा
पेन्सिलने खूण करून निश्चित करून घ्यावी. डिझाईन कापडावर
ठेवावे. डिझाईनच्या खाली कार्बन पेपरची सुलट बाजू कापडाकडे
येईल असे ठेवावे. कार्बन व कापड यास टाचण्या लावून
घ्याव्यात म्हणजे डिझाईन सरकणार नाही. कठीण पेन्सिलने डिझाईन
गिरवावे, म्हणजे कापडावर डिझाईन उठेल ( H किंवा 2H पेन्सिल)</p>

<p>सर्वसाधारण डिझाईन छापताना कापडाच्या विरूद्ध रंगाचा कार्बन
वापरावा. त्यामुळे कापडावर डिझाईन स्पष्ट दिसेल. बाजारात निळा,
काळा, जांभळास पिवळा, पांढरा, तांबडा या रंगाचे कार्बन मिळतात.
काळे अथवा कोणत्यागी गर्द रंगाचे कापड असल्यास पांढरा किंवा
पिवळा कार्बन वापरावा. पांढऱ्या व फिक्क्या रंगाचे कापड असल्यास
निळा, काळा, जांभळा, लाल यांपैकी कोणताही कार्बन वापरावा.
प्रकार 2. निळीचे डिझाईन छापणे : अ) बटरपेपर किंवा
तेलकट कागदापरवर (ऑईल पेपर) डिझाईन काढून घ्यावे. त्याला
टाचणीने बारीक बारीक छिद्रे पाडावीत. हा कागद ज्या कापडावर
डिझाईन काढावयाचे आहे त्यावर ठएवावा. एका स्वच्छ पातळ
फडक्यात निळीची पूड घालून त्याची पुरचुंडी करावी. ही तयार
केलेली पुरंचुडी छिद्रावरून दाबून फिरवावी. छिद्रामधून कापडावर
पडलेल्या निळीच्या कणांवरून पेन्सिलने गिरविले की डिझाईन
तयार होईल.</p>

<p>कार्बनने डिझाईन छापले की ते गिरवून गिरवून खराब होते. तसे
या पद्धतीत होत नाही. कारण डिझाईनची एकच बाजू सतत
वापरल्यामुळे डिझाईन खराब होत नाही. या पद्धतीचा उपयोग
साड्यांच्या किनारी, मोठमोठ्या आकृत्त्या छापण्यासाठी होतो.
ब) या पद्धतीत डिझाईनला वरीलप्रमाणेच छिद्रे पाडावीत.
स्पिरीट, नीळ किंवा शाई यांचे मिश्रण तयार करावे. डिझाईन
छापावयाच्या ठिकाणी छिद्रे पाडलेला कागद ठेवून कापसाच्या
बोळ्याने हे मिश्रण फिरवावे. म्हणजे छिद्रातून मिश्रण कापडावर
उतरून डिझाईन उठेल. शाई वाळल्यानंतर डिझाईनचा कागद
काढावा. डिझाईन ओले असताना कागद काढल्यास डिझाईन पसर-
ण्याची शक्यता असते. यासाठी हे काम दक्षतापूर्वतक करावे.
काळा अगर गडद रंगाच्या कापडावर वरील पद्धतीने डिझाईन
काढावयाचे असेल तेव्हा चुन्याची पूड वापरावी.</p>

<p>प्रकार 3 : कापडावरून छापणे : वायल, लोन ऑरगंडी,
जॉर्जेट, नायलॉन यांसारख्या पारदर्शक कापडाखाली डिझाईन ठेवावे.
कापड पारदर्शक असल्यामुळे खालचे डिझाईन सहज स्पष्ट दिसते.
कापड चुरगाळलेले असले तर इस्त्री करावी. रिंगमध्ये ताणून घ्यावे. मग
पेन्सिलवने डिझाईन काढावे `HB ' किंवा `बी' पेन्सिल वापरावी.</p>

<p>पान नं. 21</p>

<p>प्रकार 4 : लाकडी साच्याने छापणे : लाकडाच्या तुकड्यावर
निरनिराळ्या प्रकारची डिझाईन कोरलेली असतात. खडूची भुकटी
घेऊन डिंकाच्या पाण्यात घालून त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण
हातावर घेऊन लाकडी साच्यास लावावे व तोच तुकडा कापडावर
ठेवून थोडासा दाह द्यावा. थोड्या वेळाने तो साचा हलक्या हाताने
काढावा म्हणजे कापडावर डिझाईन दिसेल.
पांढऱ्या किंवा इतर खुल्या रंगाच्या कापडावर डिझाईन काढताना
खडूच्या पुडीऐवजी गेरूची पूड वापरावी. वरीलप्रमाणेच डिझाइन
छापावे.</p>

<p>प्रकार 5: स्टेन्सिल कापून छापणे : जाड कागदावर छापाव-
याची आकृती काढून ती स्टेन्सिल कटरने अथवा पात्याने कापावी.
स्टेन्सिल कापताना मोठे आकार जर असतील किंवा आकार एक-
मेकांशी जोडलेले असतील तर त्या आकारामध्ये न कापण्याचा काही
भाग सोडण्याची खबरदारी घ्यावी. खडूची पांढरी पूड व डिंक यांच्या
लुकणानंतर कागद कापडावर टाचण्यांनी टाचून घ्यावा. तयार केलेल्या
लुकणामध्ये ब्रश बुडवून कागदाच्या कापलेल्या भागातून फिरवावा.
अशी आकृती छापावी. काळ्या गडद रंगाच्या कापडासाठी ह्या
पद्धतीचा उपयोग करावा, किंवा स्टेन्सिलच्या बाह्य रेषेलगत पेन्सिलीचे
टोक फिरवल्यास आकृती उमटेल. पांढऱ्या कापडास गेरूचे लुकण
वापरावे.</p>

<p>प्रकार 6: इस्त्रीने छापणे : अ) बाजारात ट्रान्सपर पेपर
डिझाईन विकत मिळतात. ज्या ठिकाणी डिजाईन छापावयाचे आहे
त्या ठिकाणी डिझाईनची सुलट बाजू कापडावर ठेवावी. म्हणजे
डिझाईनची उलट बाजू वर येईल असे ठेवून घ्यावे. वरून गरम
इस्त्री फिरवावी म्हणजे कापडावर डिझाईन उमटेल. अशा प्रकारच्या
डिझाईनचा उपयोग फक्त एकदाच छापताना होतो. कटवर्कची
डिझाईन्स दुहेरी रेषेत असतात. हाताने छापताना रेषा वाकड्या
अथवा तुटक येण्याचा संभव असतो. यासाठी कटवर्कची डिजाईन्स
या पद्धतीने छापावीत. यामुळे रेषा स्पष्ट समान येतील.</p>

<p>ब) डिझाईनवर चिवट छापण्याचा कागद ठेवून छापण्याच्या
शाईने  डिझाईन काढून घ्यावे. डिझाईन काढून घेतलेली बाजू
कापडावर ठेवावी. कापड व कागदाला टाचण्या लावून टाचून
घ्यावे म्हणजे कागद सरकणार नाही. वरून जरा गरम इस्त्री
फिरवावी म्हणजे कापडावर डिझाईन दिसून येईल.</p>

<p>प्रकार 7 : ट्रेसिंग व्हीलने छापणे : कापड चांगले ताणून
त्यावर कार्बन ठेवावा. त्यावर आकृतीचा कागद ठेवून कागद,
कार्बन व कापड टाचण्यांनी एकत्र टाचून घ्यावे, नंतर सावधानतेने
डिझाईनच्या रेषेवरून छापण्याचे चक्र (Tracing wheel)
फिरविले असता कापडावर डिझाईन उमटेल. ही पद्धत फक्त मोठ्या
व सलग डिझाईनसाठीच उपयोगी आहे.</p>

<p>प्रकार 8: जाळीवर डिझाईन काढणे : डिझाईनच्या दोन
प्रती कराव्या. पैकी एक जाळीच्या कापडावर ठेवून धावदोऱ्याने
कागद टाचून घ्यावा. नंतर डिझाईनच्या आकारात कागदासह साखळी
अथवा उलट टीप घालावी. नंतर कागद काढून टाकावा. म्हणजे
जाळीच्या कापडावर डिझाईन दिसेल. या पद्धतीचा उपयोग विशेष
करून जाळी, मखमल यासारख्या कापडावर डिझाईन काढताना होतो.</p>

<p>डिझाईन छापताना घ्यावयाची काळजी :
1) कापड चुरगळलेले असेल तर- इस्त्री करून घ्यावे.
2. कार्बन जुना वापरावा. कार्बन नवीन असल्यास त्याचे डाग
कापडावर पडतत. नवीन कार्बन असल्यास कापसाने चांगला
पुसून घ्यावा. म्हणजे कार्बन फिका होईल.
3. पेन्सिलचे टोक अणकुचटीदार असावे म्हणजे रेषा बारीक
व स्पष्ट येतील, जर टोक जाड असेल तर रेषा जाड येतील.
4. डिझाईन हलक्या हाताने छापावे. जोर देऊन छापल्यास
डिझाईनचा कागद व कार्बन पेपर फाटेल व डिझाईन ठळक येऊन,
भरताना त्याचे रंग आजूबाजूला पसरून कापड व धागे मळतात.
5. डिझाईन छापताना हातातील बांगड्या नीट वर सरकवून
घ्याव्यात, बांगड्यामुळे कार्बनचे डाग कापडावर पडणार नाहीत.
6. डिझाईन छापताना डिझाईन सरकू नये म्हणून त्यास
(डिझाईन, कार्बन व कापड मिळून) टाचण्या लावून घ्याव्यात.</p>

<p>पान नं. 22</p>

<p>7. डिझाईन छापताना खाली सलग पाट असावा. जोडाचा पाट
अथवा खाचखळगे असतील तर डिझाईन छापताना पेन्सिल खड्याच्या
ठिकाणी आत जाऊन कागद पाटेल व व्यवस्थित छापता येणार नाही.
8. डिझाईनच्या रेषा चांगल्या आकारात काढाव्यात. त्याच
आकारावर पुन्हा गिरवू नये. गिरवल्यामुळे डिझाईन खराब येते.
9. डिझाईन छापताना सारखे किती छापले गेले, हे पाहू नये.
कारण यामध्ये डिझाइन सरकण्याचा संभव अधिक असतो.</p>

<p>डिझाईन लहानाचे मोठे अथवा मोठ्याचे लहान करणे</p>

<p>डिझाईन लहानाचे मोठे व मोठ्याचे लहान करताना डिझाईनच्या
आकाराला लागून आडव्या व उभ्या लहान-मोठ्या आकाराच्या
चौकटी आखून घ्याव्यात. मग डिझाईन काढावे. खालील आकृतीत
दाखवल्याप्रमाणे करावे.</p>

<p>भरतकला टिकवणे</p>

<p>भरतकाम केलेली वस्तू बराच काळ टिकवून त्याचा योग्य
ठिकाणी उपयोग करून घरशोभा वाढवणे ही एक कला आहे.</p>

<p>कापड व रेशमी पक्क्या रंगाचे वापरावे. केलेली वस्तू दीर्घ
काळ ठिकावी म्हणून कपडे धुताना चांगल्या प्रतीचा साबण वाप-
रावा. धुताना कपडा हातातच चोळावा, न पिळता दाबून वाळत
घालावा. कपडे साबणाच्या पाण्यात भिजत ठेवू नयेत. त्यामुळे
कपड्यांचा रंग कमी होत जातो. इस्त्री करताना कापडाच्या उलट
बाजूने इस्त्री करावी किंवा भरतकाम केलेल्या भागावर थोडा ओला
पातळ कपडा ठेवून इस्त्री करावी. नंतर कागदाच्या किंवा प्लॅस्टिक-
कच्या पिशवीत घालून कपाटात ठेवताना बाजूला डांबराच्या गोळ्या
ठेवाव्यात. रेशमी कपडा व रेशमी धाग्यांनी भरलेले भरतकामाचे
कपडे व लोकरीचे कपडे, आणि गरम कपड्यांवर भरलेले भरत-
कामाचे, तसेच जरी भरतकामाचे कपडे ड्रायक्लिन करून घ्यावे.
गरम व लोकरीचे कपडे वारंवार उन्हात वाळत घालावेत. त्यामुळे
कपड्याला कसर लागत नाहीत. वरीलप्रमाणे कपड्यांची काळजी
घेतली, तर भरतकाम केलेल्या वस्तू जास्त काळ टिकतात.</p>

<p>पान नं. 23</p>

<p>विविध प्रकारचे टाके</p>

<p>1)रनिंग स्टीच (धावदोरा) :  हा टाका सर्व टाक्यांत
सोपा आहे. भरतकामाप्रमाणेच शिवणकामात ह्या टाक्याचा फार
उपयोग होतो. धावदोऱ्याने कापडाला कापड जोडता येते. धावदोरा
सारख्या प्रमाणात घालून धागा ओढून घेऊन आलेल्या चुण्यावर
स्मोकिंगसारखे पुष्कळ प्रकारचे भरतकाम करता येते.</p>

<p>कृती : दोन पदरी धागा घेऊन टाक्याला सुरूवात करण्यापूर्वी
सुई कापडावर काढावी. 4-5 सुते अंतर ठेवून ती रेषेवर खाली
घालावी व परत 4-5 सुते अंतरावर वर काढावी याप्रमाणे हे टाके
पाहिजे त्या प्रमाणात लहान किंवा मोठे पणअंतर सारखे ठेवून
भरावेत. धागा संपल्यानंतर सुई कापडाच्या मागील बाजूस घेऊन
धाग्यात धागा जिरवून गाठ घालून उरलेला धागा कात्रीने नीट
कापावा. मगच पुढील भरतकामाला सुरूवात करावी. असे केले
असता मागील भाग स्वच्छ राहील.</p>

<p>वर सांगिलेल्या व्यतिरिक्त पाने, फुले, प्राणी, मानव भरण्यास
हे टाके वापरावेत. तसेच कटवर्क, सँटिन, स्टिच , व रिचेल्युवर्कसाठी
पॅडिंगसाठी धावदोरा वापरावा.</p>

<p>पान नं. 24</p>

<p>2) व्हील्ड रनिंग किंवा लेसड् रनिंग स्टिच(धावदोऱ्यावरील पिळाचा टाका)
शोभेच्या टाक्यांपैकी हा एक टाका. करावयास
सुलभ, होण्यास जलद व दिसण्यात सुंदर असा हा टाका आहे.
याचे दोन प्रकार आहेत. यास ओव्हरकास्ट स्टिच असेही म्हणतात.</p>

<p>कृती अ) सुरूवातीस फिक्या रंगाच्या धाग्याने धावदोरा
घालावा. नंतर सुईत गड़द रंगाचा धागा घेऊन पहिल्या टाक्याच्या
खालून वर व पुढील टाक्याच्या वरून खाली या क्रमाने वरचेवर
पीळ घालावा.
ब) यामध्ये कृती पहिल्याप्रमाणेच आहे. परंतु दुसऱ्या रंगाचा
धागा जरा सैल ठेवून भरावे. म्हणजे गोलाकार वळणे स्पष्ट दिसतील.
या टाक्यांनी परड्या, रूमालाच्या कडा, लहान मुलांच्या
कपड्यांच्या किनारी भरता येतात.</p>

<p>3) बँक स्टिच (टिपेचा टाका) कृती : ज्या रेषेवर
घालावयाची आहे त्या रेषेच्या टोकाच्या सुरूवातीपासून 4-5 सुते
अंतर सोडून प्रथम सुई वर काढावी. ती परत सुरूवातीच्या बिंदूतून
खाली घालून प्रथम बिंदूच्या पुढे 4-5 सुते अंतर ठेवून वर
काढावी. याप्रमाणे पुढून मागे असे टाके घालत जावे. टाके एक-
सारखे येण्यासाठी त्यातील अंतर सारखे ठेवावे. म्हणजे काम सुबक
दिसेल. हे टाके मागून स्टेम स्टिच सारखे येतात.
थ्रेडेड बॅक स्टिच, पेकिनीच स्टिच या टाक्यांच्या सुरूवातीस
या टाक्यांचा उपयोग होतो. तसेच डिझाईनमधील देठ व रेषा
भरण्यास होतो.</p>

<p>*
----------------------------------------------------------------
Cont'd</p>

<p></p>

<p></p></body></text></cesDoc>