<cesDoc id="mar-w-arts-drawing-dr00a001.maf" lang="mar">
<cesHeader type="text">
<fileDesc>
<titleStmt>
<h.title>mar-w-arts-drawing-dr00a001.maf.txt</h.title>
<respStmt>
<respType>Electronic file created by</respType>
<respName>Central Institute for Indian Languages, Mysore</respName>
<respType>transferred into Unicode and CES format by</respType>
<respName>"Unicodify" software by Andrew Hardie</respName>
</respStmt></titleStmt>
<publicationStmt>
<distributor>UCREL (on behalf of CIIL)</distributor>
<pubAddress>Department of Linguistics, Lancaster University, Lancaster, LA1 4YT, UK</pubAddress>
<availability region="WORLD"></availability>
<pubDate>03-07-25</pubDate>
</publicationStmt>
<sourceDesc>
<biblStruct>
<monogr>
<h.title>चित्रकला भारती</h.title>
<h.author>म.वि.सोवनी</h.author>
<imprint>
<pubPlace>India</pubPlace>
<publisher>Unknown - नितीन वसंत गोगटे</publisher>
<pubDate>****</pubDate>
</imprint>
<idno type="CIIL code">dr00a001.maf</idno>
</monogr></biblStruct></sourceDesc></fileDesc>
<encodingDesc>
<projectDesc>Text collected for the CIIL Corpus, subsequently integrated into the EMILLE/CIIL Monolingual Written Corpora.</projectDesc>
<samplingDesc>Simple written text only has been transcribed. Diagrams, pictures and tables have been omitted. Sampling begins at page पुणे.</samplingDesc>
<editorialDecl><conformance level="1"></conformance></editorialDecl>
</encodingDesc>
<profileDesc>
<creation><date>03-07-25</date></creation>
<langUsage>Marathi</langUsage>
<wsdUsage>
<writingSystem id="ISO/IEC 10646">Universal Multiple-Octet Coded Character Set (UCS).</writingSystem>
</wsdUsage>
<textClass>
<channel mode="w">print</channel>
<constitution type="composite"></constitution>
<domain type="public"></domain>
<factuality type="fact"></factuality>
</textClass>
<translations></translations>
</profileDesc>
<revisionDesc></revisionDesc>
</cesHeader>

<text><body>

<p>एकूण पाने :- 19
From 9 to  76</p>

<p>
--------------------------------------------------------
+
पान नं. -   9</p>

<p>                   1: रेखाकला परीक्षांची माहिती</p>

<p>        महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाद्वारा ह्या परीक्षा प्रतिवर्षी एकदा ( बहुधा ऑक्टोबर
महिन्यात ) घेतल्या जातात. पहिल्या परीक्षेचे नाव 'एलिमेंटरी ग्रेड ड्रॉईंग' असे असून दुसरी परीक्षा
'इंटरमीजिएट ग्रेड ड्रॉईंग' परीक्षा या नावाने संबोधली जाते. कलाशिक्षणाच्या कोणत्याही शाखेच्या उच्च
शिक्षणासाठी इंटरमीजिएट ग्रेड परीक्षा उत्त्तीर्ण असणे ही आवश्यक अट असते. त्याचप्रमाणे वैद्यकीय.
अभियांत्रिकी अथवा त्यासारख्याच तांत्रिक शाखांमधून इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असणे ही जादा
गुणवत्तेची बाब समजून त्याला प्राधान्य दिले जाते.</p>

<p>        शासनमान्य शिक्षणसंस्थातील ( बहुधा माध्यमिक शिक्षणाच्या शाळा ) विद्यार्थ्यांना तसेच इतर
कोणाही खाजगी उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश दिला जातो. मात्र शासनमान्य शिक्षणसंस्थेतील अधिकृत
विद्यार्थी सोडून इतर सर्वजण ह्या परीक्षांसाठी 'खाजगी उमेदवार' म्हणूनच मानले जातात. ( त्यांचा
पारितोषिकांसाठी विचार केला जात नाही.)</p>

<p>        कोणत्याही परीक्षार्थ्यास एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण  न होताही एकदम इंटरमीजिएट ग्रेड
परीक्षेस बसता येईल. परंतु कोणासही एकाच वर्षी दोनही परीक्षांना बसता येणार नाही.</p>

<p>        सर्वसामान्यतः महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील बहुतेक तालुक्यांच्या व इतर प्रमुख गावांतून ह्या
परीक्षांची केद्रे ठेवलेली आहेत. व त्या 'परीक्षा केंद्र संचालकांना' परीक्षार्थीचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची
परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे खाजगी उमेदवारांनी आपल्या नजीकच्या संबंधित
केंद्रसंचालकांकडे याबाबत
विचारणा करावी कोणत्याही सराकारमान्य माध्यमिक शाळांतून अशी माहिती मिळू शकेल. मुंबईच्या
कला-
संचालनायलाकडे प्रवेश अर्ज परस्पर पाठविता येणार नाही. ते कोणत्याही अधिकृत परीक्षाकेंद्र
संचालकांच्या तर्फेच गेले पाहिजेत. परीक्षा सुरू होण्याच्या दिनांकाच्या (सामान्ययतः) साहा आठवडे
आधी प्रवेश अर्ज परीक्षा फीसह स्वीकारले जातात. एलिमेंटर परीक्षेची फी 6 रूपये आहे व
इंचरमीजिएट परीक्षा फी 8 रूपये आहे.</p>

<p>दोनही परीक्षांसाठी प्रत्येकी सहा विषय असून ते सर्व आवश्यक आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा
कालावधी 2 दिवसांचा असून इंटरमीजिएट परीक्षा 3 दिवसांची असते. सर्व विषयांसाठी उत्तर पत्रिका
(1/4) इंपिरिअल आकारचा डॉइंगपेपर (38 सें.मी.  28 सें.मी.) शासनाकडून पुरविली जाते. इतर
आवश्यक ते सर्व साहित्य उमेदवाराने स्वतःचेच वापरावयाचे असते.</p>

<p>परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराने सर्वच्या सर्व सहाही विषयांना बसणे आवश्यक आहे. एखाद्य.ा
विषयांत तो गैरहजर असेल तर त्याला अनुत्तीर्ण ठरविण्यात येते.</p>

<p>परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करताना तो, विद्यार्थ्याच्या परीक्षेतील संकलित कामानुसार अ,ब,क
अशी श्रेणी देण्यात येऊन, त्यांसह जाहीर केला जातो. उत्तरपत्रिकेला इतर विषयांप्रमाणे गुण देण्यात येत
नाहीत. तसेच वेगवेगळ्या विषयांचे निकालही जाहीर केले जात नाहीत, एकूण परीक्षेत श्रेष्ठ
गुणवत्तेनुसार
येणाऱ्या पहिल्या पंचवीस क्रमांकाची यादी सर्व परीक्षाकेंद्रातून जाहीर केली जाते. पंचवीसच्या पुढचे
क्रमांक
देण्यात येत नाहीत. हे पहिले पंचवीस क्रमांक सर्वसाधारण गुणवत्ताक्रमांकानुसार असतात. त्यांत
अधिकृत व
खाजगी असा भेदभाव केला जात नाही. मात्र खाजगी उमेदवार शासकीय पारितोषिकांसाठी पात्र ठरत
नसतो.</p>

<p>शासकीय पारितोषिकाच्या गुणवत्तेसाठी पात्रतच्या अटी अशा आहेत.</p>

<p>अ) उत्तीर्ण परीक्षार्थी महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही शासनमान्य माध्यमिक शाळेचा अधिकृत
विद्यार्थी असलाच पाहिजे.</p>

<p>पान नं. 10</p>

<p>ब) एलिमेंटरी परीक्षेस बसताना अशा विद्यार्थीचे वय 17 पूर्णतेच्या आत व इंटरमीजिएट परीक्षेस
बसताना हे वय 18 पूर्णतेच्या आत असले पाहिजे.</p>

<p>सर्व यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या कलासंचालनालयातर्फे प्रमाणपत्रे देण्यात येतात.
ह्या रेखाकला परीक्षांतील विषयांचा तपशील व आकृतिबंध पुढीलप्रमाणे आहे.</p>

<p>एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा</p>

<p>विषय : 1) स्थिर चित्र (स्टिल लाइफ)
परीक्षेचा कालावधी : 2 1/2 तास.
माध्यमे. पेन्सिल व इतर कोणत्याही स्वरूपाचे रंग.
विषयाचे स्वरूप : परीक्षार्थीप्रमाणे ठेवलेल्या 3 ते 5 वस्तूंचा एका साध्या मांडणीच्या वस्तु-
संचाचे रेखांकन व रंगीत चित्रण करणे.
2) निसर्ग चित्र (नेचेर ड्रॉइंग )
परीक्षेचा कालावधी : 2 तास
माध्यमे : पेन्सिल आणि जलरंग
विषयाचे स्वरूप : अ) मध्यम आकाराची 3 ते 5 पाने व एक दोन फुले असणाऱ्या
डहाळीचे रेखांकन व रंगीत चित्रण करऑणे. ब) डहाळीच्या विशिष्ट भागावंचे (सांधे, पाने
मुगारे इ. ) मोठ्या आकारात रेखांकन करणे.
3) स्मरण चित्र (मेमरी ड्रॉइंग)
परीक्षेचा कालावधी : 1 तास
माध्यमे : पेन्सिल व रंग
विषयाचे स्वरूप : दिलेल्या सजीव व निर्जीव वस्तूंच्या आधारावर चित्रनिर्मिती करणे व रंगवणे
4) संकल्प चित्र (डिझाइन)
परीक्षेचा कालावधी : 2 1\2 तास.
माध्यमे : पेन्सिल व रंग.
विषयाचे स्वरूप : विशिष्ट उद्देशासाठी भौमितिक अथवा अलंकरणात्कम वा केवल अमूर्त
आकारांची रचना करणे, चित्र निर्माण करणे व रंगवणे.
5) मुक्त हस्त चित्र ( फ्री हँड ड्रॉईंग)
परीक्षेचा कालावधी : 1 1/2 तास
माध्यमे : पेन्सिल.
विषयाचे स्वरूप : दिलेल्या आकृतीची नेटकी व प्रमाणबद्ध प्रतिकृती यांत्रिक उपकरणांची
मदत न घेता केवळ हाताने रेखांकित करणे.</p>

<p>कर्तव्य भूमिती ( प्लेन प्रॅक्टिकल जॉमेट्री )
परीक्षेचा कालावधी : 1 1/2 तास.
माध्यमे : पेन्सिल किंवा शाई.</p>

<p>पान नं. - 11</p>

<p>विषयांचे स्वरूप : सांगितलेल्या भौमितिक रचना नेटकेपणाने व काटेकोर मापांत काढणे</p>

<p>इंटरमीजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षा</p>

<p>        ह्या परीक्षेलाही वरील सहा विषयच आहेत. मात्र प्रत्येक विषयात जरा अधिक उच्च पातळीवरचे
काम अपेक्षित आहे. काही अधिक गोष्टीही परीक्षार्थीनी कराव्यात असे सांगितले आहे. त्यासाठी प्रत्येक</p>

<p>विषयाच्या परीक्षेचा कालावधीही वाढवून दिलेला आहे. हे बदल पुढे थोडक्यात दिले आहेत.</p>

<p>        1) स्थिर चित्र : वेळ 3 तास. चित्रात वस्तूंवरील छायाप्रकाश, पोत इत्यादी दाखवणे अपेक्षित
आहे.
        2) निसर्ग चित्र : वेळ 3 तासच आहे. चित्रात पाने व फुले यांचे अलंकरणात्मक आकृतिबंध
दाखवणे अपेक्षित आहे.
        3) स्मरण चित्र : वेळ 1 तासच आहे. तथापि प्रसंगचित्रातील एकंदर संयोजन. हावभाव व कृती
यांना अधिक प्राधान्य आहे.
        4) संकल्प चित्र : वेळ 3 तास. दोन्ही परीक्षांच्या स्वरूपात बदल नाही, फक्त अधिक उच्च
दर्जाचे काम अपेक्षित आहे.
        5) मुक्तहस्त चित्र : वेळ 2 तास. चित्र दिलेल्या नमुन्याबरहुकूम रंगवून पूर्ण करावयाचे आहे.
        6) भूमिती आणि अक्षर लेखन : वेळ 3 तास. पहिल्या परीक्षेप्रमाणेच या परीक्षेसाठी नियोजित
भूमिती रचना करण्याबरोबरच अधिक म्हणजे (1) दिलेल्या घन आकाराचे अनुविक्षेप आणि
उद्विक्षेप काढता येणे. (2) दिलेल्या मापांची प्रमाणपट्टी करणे व (3) दिलेल्या जागेत नाव
किंवा शीर्षक वळणदार, नीटनेटक्या अक्षरात लिहिणे, ह्या गोष्टी अपेक्षित आहेत.</p>

<p>             2: तयारीसाठी आवश्यक साहित्य</p>

<p>        रेखाकला परीक्षेसाठी जे विषय नेमलेले आहेत त्यांमध्ये काही विषयांची चित्र रंगवून पूर्ण
करावयाची तर काही विषयांत फक्त पेन्सिलीचेच काम अपेक्षित आहे. काही विषयांत पट्टी, कंपास
इत्यादी यांत्रिक साहाय्य घ्यावयाचे नसते तर भूमितीसारखा विषय केवळ यांत्रिक सांधनांनीच
सोडवावयचा असतो. एवढयासाठी, आपणांस चित्रकलेचे म्हणून समजले जाणारे सर्वच साहित्य
आवश्यक आहे असे समजण्यास हरकत नाही. त्याची माहिती अशी -</p>

<p>        कागद : कार्ट्रिज किंवा ड्रॉइंग पेपर म्हणून जो बाजारात मिळतो तो 76 सेमी  56 सेमी अशा
आकारात मिळतो. या आकाराला इंपिरियल साईज असे नाव आहे. परीक्षेसाठी प्रत्येक चित्र आपणास
1/4 इंपिरिअल आकाराच्या ( 38 सेंमी X 28 सेंमी) कागदावर काढावे लागते. तेव्हा सरावासाठी
सुद्धा तेवढ्याच आकाराचे कागद वापरणे आवश्यक आहे. म्हणजे कागदाच्या आकाराच्या मानाने
आवश्यक तेवढे मोठे चित्र काढण्याची सवय आपणांस आपोआपच होऊन जाईल.</p>

<p>        भूमितीची कृत्ये सोडवून पाहण्यासाठी साधी एक्सरसाइज वही साधे पाठकोरे कागद वापरले तरी
हरकत नाही. तेवढयाकरिता महाग ड्रॉईंग पेपरचा उपयोग टाळला तर अधिक बरे होईल.</p>

<p>        याशिवाय आणखी एक साध्या , कोऱ्या कागदांची वही कच्ची रेखाटने करण्यासाठी म्हणून
अवश्य. असावी. माणसांच्या वा जनावरांच्या विविध हालचालींची जलद रेखाटने या वहीत करणे
फायदेशीर ठरते.</p>

<p>पान नं. - 12</p>

<p>पेन्सिल : बाजारात कठीण आणि मऊ शिशाच्या दोन्ही तऱ्हांच्या पेन्सिली विकत मिळतात. H हे
अक्षर शिशाचा कठीण पणा दाखविण्यासाठी पेन्सिलवर लिहिलेले असते. एच्् पासून 6 एच्् पर्यंत
वेगवेगळ्या काठीण्याच्या  ह्या पेन्सिली असतात. अशा पेन्सिलींनी कागदावर अगदी पुसट रेघा येतात.
भूमितीच्या आकृती मध्ये रचनेचे सर्व काम H किंवा 2H पेन्सिलीने केले तर फार फायदेशीर ठरते
म्हणून अशी एक कठीण (H) पेन्सिल अवश्य जवळ हवी.</p>

<p>        नेहमी आपण जी साधी म्हणून HB अशी अक्षरे लिहिलेली असते. त्याचा अर्थ ती मध्यम प्रकारची
किंवा फार कठीण नसणारी. तेव्हा अशी HB पेन्सिल तर सदैव सर्व कामासाठी हवीच.</p>

<p>        पेन्सिलवर नुसतेच B असे अक्षर असेल तर ती मऊ शिशाची व अधिक काळी उठणारी अशी
असते.  B पासून 6B पर्यंत अधिकअधिक काळेपणा व मऊपणा वाढत जाणाऱ्या पेन्सिली असतात.
आपणांला उपयुक्त ठरणारी 2B ची एखादी पेन्सिल जवळ ठेवण्यास हरकत नाही. केवळ पेन्सिलीच्याच
कामात अधिक ठळकपणा दाखविणे आवश्यक अशते तेव्हा 2B पेन्सिल फारच उपयुक्त ठरते.</p>

<p>        ह्या सर्वच पेन्सिलीचा वापर करताना एकच्या एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन
तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा. लांब पेन्सिलच्या हालचालीपेक्षा आखूड
पेन्सिलीच्या हालचाली अधिक सफाईदारपणे होतात. तसेच वापरतेवेळी सर्वच पेन्सिलीची टोके लांब,
निमुळती व टोकदार असावीत. आखूड व जाड टोके असतील तर रेषा बोजड येतात.</p>

<p>        रबर : मऊ आणि पेन्सिलीचे काळे कण चटकन दूर करील असे रबर असावे. अलीकडे
चांगल्या दर्जाची रबरे सर्वत्र मिळतात. म्हणून त्याबद्दल विशेष लिहीत नाही.</p>

<p>      कंपासपेटी : कर्कटक ( कंपास ) तीक्ष्ण टोकांचा असावा. तसेच तो आवश्यक तेवढा द्दढ
असावा त्याच्या केंद्रबिंदूची यंत्रणा सैल नसावी. कोनमापकावरील सर्व कोन सुस्पष्ट रेखाटलेले असावेत.
गुण्ये खरोखरच काटकोनात कापलेले असावेत. 6 इंची पट्टीवरील मापांच्या सर्व रेखा स्वच्छ
दिसाव्यात. एक चांगली फूट पट्टी( 30 सें.मी. लांबीची ) ही अतिशय आवश्यक आहे. आता सर्व
मापन मीटरपद्धतीचेच असल्यामुळे डेसिमीटर, सेंटिमीटर ही मापने त्यावर अचूक दिसावीत. पट्टीची
कड सरळ, एकाच पातळीत व गुळगुळीत पृष्ठभागाची असावी.</p>

<p>        रंग : बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध असणारे जसरंग म्हणजे वडया किंवा ट्यूब्जच्या पेटया.
पूर्वी पारदर्शकपणा जाणवणारे जलरंग मिळत असत. हल्ली ते लुप्त झाले असून सगळीकडे एकाच
पद्धतीचे जलरंग वडयांच्या अथवा ट्यूब्जच्या स्वरूपात मिळतात. ते काहीसे अपारदर्शक असतात.
पोस्टर कलर्स म्हणून मिळणारे जलरंग बाटल्यांतून भरलेले असतात. सर्वसामान्यपणे विद्यार्थ्यांनी वड्यांची
अथवा टयूब्जची पेटी घेणे योग्य ठरेल. सर्वसाधारणपणे पुढील प्रकारचे रंग आपणाजवळ असणे इष्ट
ठरेल. 3 पिवळे ( क्रोम यलो, लेमन यलो आणि यलो ऑकर ) , 3 निळे ( कोबाल्ट ब्लू,
अल्ट्रामरीन, प्रशियन ब्लू ), 3 लाल ( कारमाइन, क्रिमझन लेक आणि व्हर्मिलिअन), 2 हिरवे (
व्हेरिडियन, डीप ग्रीन) 1 काळा व 1 पांढरा . इतर रंगाच्या मानाने पांढरा रंग
अधिक लागतो म्हणून, पोस्टर व्हाइट रंगाची 1/2      औसांची बाटलीच वापरावी असा मी आग्रह धरीन.</p>

<p>        हल्लीच्या परीक्षेत वेळ थोडा आणि रंगकामाचे क्षेत्रफळ वाढलेले असा प्रकार, शिवाय त्यात पोत (
टेक्श्वर) या मूलतत्वालाही बरेच प्राधान्य मिळाल्यामुळे वर सांगितलेल्या जलरंगाच्या जोडीला मी रंगांच्या
कांडयाही ( पेस्टल््स््) वापराव्यात असे आग्रहाने सुचवितो. अलीकजे बऱ्याच कंपन्यांच्या ऑइल
पेस्टल्स््च्या</p>

<p>पान नं. - 13</p>

<p>स्वरूपात दर्जेदार रंगकांडया आहेत. मूळ जलरंगाचा एक थर दिल्यानंतर त्यावर ह्या कांडयांचा वापर
करून झटपट आणि उठावदार परिणाम साधता येतो. म्हणून अशा ऑइल पेस्टल्सचीही एक पेटी
आपल्या साहित्यात अवश्यमेव हवी. क्रेयॉन ( मेणकांडया) चे रंग वापरू नयेत. ते अडचणीचे ठरतात.
त्याऐवजी ऑईल पेस्टल््स््च वापराव्यात.</p>

<p>ब्रश : जलरंगाने रंगवण्यासाठी चांगले ब्रश किंवा कुंचले अत्यावश्यक आहेत. ह्या ब्रशांचे केस मऊ
असावेत. तसेच रंगात बुडवून काढल्यावर त्याला एकच एक टोक आलेले असावे. ह्या दोन
कसोटयांनी युक्त असणारे ब्रश चांगले आहेत असे समजावे. मग ते खारीच्या केसांचे असावेत, उंटाच्या
केसांचे असोत किंवा सेंबलच्या केसांचे असोत. पूर्वी चित्राचा आकार जेवढा लहान होता तेव्हा 3 नंबर
आणि 5 नंबरचे ब्रश ठीक होते. आता तेवढयाने भागणार नाही. 9 किंवा 10 नंबरच्या एखादा मोठा
ब्रश असणे फार जरुरीचे आहे. त्याचा वॉश देण्यासाठी किंवा मोठा आकार चटकन भरण्यासाठी
मोठाच उपयोग होतो. या कामासाठी मऊ केसांचे चपटे ब्रशही मिळतात. वाटल्यास त्यांचाही वापर
करावा. पण ती अत्यावश्यक गरज नाही.</p>

<p>स्केच पेन : काळ्या रंगाचे एक स्केच पेनही आपल्या साहित्यात अवश्य पाहिजे. चित्रांच्या आकृतींना
बाह्यरेषा झटपट काढण्यासाठी ते फार उपयुक्त ठरते. कंपासमध्ये वापरून सुरेख वर्तुळेसुद्धा त्याने
रेखता येतात.</p>

<p>        वरील अत्यावश्यक साहित्याशिवाय जे पूरक साहित्य आवश्यक आहे. त्यात पाणी ठेवण्यासाठी
रुंद तोंडाचे भांडे ( मोठी वाटी किंवा वाडगा ) रंग तयार करण्यासाठी किंवा कालवण्यासाठी थाळी, (
पॅलेट किंवा डिश ) आणि रंग अथवा ब्रश पुसून स्वच्छ करण्यासाठी एकादे मऊ फडके या गोष्टी
हव्यातच. आणि मुख्य म्हणजे उत्तरपत्रिका म्हणून मिळणाऱ्या ड्रॉइंग पेपरच्या खाली धरण्याकरिता
तेवढ्याच आकाराच जाड कार्डबोर्ड किंवा
लाकडाचा पाट(बोर्ड) हाही हवाच कारण एरवी आपण घरी कशीही प्रॅक्टिस करतो. परीक्षेत जी बैठक
आपल्या वाटयाला आलेली असते ती उत्कृष्ट आणि सर्वस्वी अनुकूल असेलच असे नाही. म्हणून योग्य
आणि
आवश्यक ते ते सर्व साहित्य आपलेच आपणांजवळ असले पाहिजे. त्याशिवाय बोर्डावर कागद पक्का
करण्या-
करिता ड्रॉइंग पिन्स किंवा क्लिप्स् (चाप) हव्यात.</p>

<p>(परीक्षेच्या वेळी आपले नाव क्रमांक, विषय , इ. माहिती उत्तरपत्रिकेवर लिहिण्यासाठी, शाई
भरलेले एक साधे पेनही न विसरता जवळ ठेवावे.)</p>

<p>3. सरावासाठी उपयुक्त सूचना</p>

<p>रेखाकला परीक्षतीलप्रत्येक विषयाचे काम त्या त्या विशिष्ट तंत्रबद्ध चौकटीत, विशिष्ट वेळात, आणि
विशिष्ट आकारात, करावे लागते. ती सवय तर प्रथमपासून हवीच, परंतु त्या त्या विषयाची काही
पूर्वतयारी, प्राथमिक
ज्ञान, याचीही प्रथम ओळख करून घेणे फार आवश्यक आहे. परीक्षापद्धतीने सराव चालू असतानासुद्धा
त्याच्याशी
संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टींचे प्रयोग करून पाहणे, सतत चालू ठेवणे, हे फार फायद्याचे ठरते.
तेव्हा
तशा तऱ्हेच्या सर्व सूचना या प्रकरणात मुद्दाम विस्ताराने दिल्या आहेत. त्यांपैकी काही त्या त्या
विषयाची
पूर्वतयारी म्हणून उपयुक्त आहेत, तर काही तंत्राचे वा पद्धतीचे अधिक ज्ञान होण्याच्या दृष्टीने उपयुक्त
आहेत.
ही सर्व माहिती वारंवार वाचून विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर फारच चांगले.</p>

<p>पान नं. 14</p>

<p>कागदावर चित्राचा आकार : कोणत्याही विषयाची परीक्षा असली तरी त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक
महत्त्वाचा इषारा दिलेला असतो की, ""चित्र पुरेशा मोठ्या आकारात काढा. फार लहान चित्राला गुण
मिळणार नाहीत."" सराव करातानासुद्धा हे वाक्य सदैव नजरेसमोर ठेवून प्रथमपासूनच प्रत्येक चित्र
भरपूर मोठे काढण्याचा
परिपाठ ठेवावा. मोठे म्हणजे नेमके केवढे चित्र व फार लहान म्हणजे केवढ्या आकाराचे हे नक्की
काटेकोरपणेसांगता येणे कठीण आहे. तथापि ढोबळमानाने असे खास म्हणता येईल की कागदाच्या एकूण
क्षेत्रफळाच्या
निम्म्या क्षेत्रफळापेक्षा तरी चित्र लहान काढू नये. चित्राचा आकार निम्म्यापेक्षा अधिक असला तरी
चालेल. परंतु तो कमी मात्र कधीही असू नये. (सेंमी मापाच्या लांबीरूदींत बोलायचे म्हटले तर
परीक्षेचा
कागद 28  38 सें.मी या मापाचा असतो. अर्थात त्याच्या निम्म्या क्षेत्रफळाचा आयत 19  28
सें.मी एवढ्या
आकाराचा होईल. तर 19  20 सें.मी. एवढा तरी कमीतकमी तुमच्या चित्राचा आकार असणे
आवश्यक आहे.) ह्या मापात विषयानुरूप लांबीत अथवा रूंदीत कमीजास्त बदल होईलही परंतु
सर्वसाधारणतः ही मर्यादा
कायमपणे पाळली जावीच.</p>

<p>कागद उभा धरावा का आडवा धरावा. : हेही त्या त्या विषयाच्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे
ठरवावे लागते. नेचरसाठी दिलेली झाडाची फांदी उंच असून तिच्या दोन्ही बाजूंची पाने छोटी असतील
तर
चित्र उभे, अधिक उंचीचे काढणे योग्य म्हणून कागद उभा धरावा लागेल. त्याउलट
कण्हेरीसारख्या-ज्याची
पाने खूपच खूप लांब असून फांदीच्या दोन्ही बाजूला पसरलेली असतात अशा- झाडाची छोटी फांद9ी
असेल
तर एकंदर विस्तार आडवा जास्त असतो म्हणून कागद आडवा धरणेच अधिक योग्य. वस्तुचित्राचा
संच अगदी
समोर बसलेल्या विद्यार्थ्याला उंची जास्त व रूंदी कमी असा उभा दिसतो. त्यामुळे तेथेही कागद उभा
आडवा अशा दोन्ही पद्धतीनी वापरलेला आपणांस आढळून येईल. तीच गोष्ट फ्री हॅण्ड या विषयाच्या
बाबतीत
म्हणावी लागेल. डिझाइन या विषयासाठी बहुधा निश्चित मापे सांगितलेली असतातच तिथे हा प्रश्न
येत नाही. जॉमेट्री या विषयात कागदाच्या एका बजूवर भूमितीची रचना कृत्ये आणि दुसऱ्या बाजूवर
घनभूमिती व
अक्षरलेखन असे भाग सोडावयाचे असतात तेव्हा सोयीच्या दृष्टीने कागद आडवाच धरणे जास्त योग्य
ठरते.
स्मरणचित्राच्या बाबतीतही कागद आडवा धरणे इष्ट आहे. कारण की समूहदृश्यांतील माणसांचे आकार
पुरेसे
मोठे असून शिवाय योग्य तेवढी पार्श्वभूमी मिळविण्याच्या दृष्टीने आडवा कागदटच फायदेशीर ठरतो.
आकार
उभा घेतला तर जमीन व आकाश यांना विनाकारण फारच मोठी जागा मिळते व पार्श्वभूमीवर काढलेली
माणसे
चित्राच्या मानाने फार लहान वाटू लागतात. ती वाजवीपेक्षा मोठी काढली तरीही ते विसंगत दिसते.
म्हणून
स्मरणचित्रासाठी सहसा उभा कागद न धरता आडवाच धरावा. अर्थात हे सर्व तारतम्याने ठरवावयास
हवे.
परंतु सराव करतानाच योग्य ती सवय प्रथमपासून ठेवली तर त्याचा फायदा परीक्षेच्या वेळी हमखास
होतो म्हणून
हे आधीच सांगितले आहे.</p>

<p>मापे घेण्याची योग्य पद्धत :- पट्टी किंवा यांत्रिक मापे असलेल्या साधनांचा उपयोग न करता
नुसत्या अंदाजाने मापे मोजून त्यांचा उपयोग मुख्यत्वेकरून स्थिर चित्र (स्टिल लाइफ) व त्या
खालोखाल
मुक्तहस्त चित्र (फ्री हॅण्ड) या विषयांच्या वेळी करावा लागतो. आपल्या जवळच्या पेन्सिलीने अशी मापे
घेण्यास
परवानगी आहे. आपला हात, डोळा आणि पेन्सिल यांचा एकत्रित उपयोग करून ही मापे मोजतात.
मोजण्याची योग्य पद्धत कोणती ते येथे सविस्तर सांगितले आहे.</p>

<p>पान नं. 15</p>

<p>1) पेन्सिल फक्त हाताच्या बोटांच्या साहाय्याने हाताळा.</p>

<p>आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे उजवा हात पालथा धरा. क्रम. 1 व 4 बी बोटे ताठ ठेवा. व क्रम.
2
आणि 3 ही बोटे मिटा. ताठ बोटांच्या खाली एक पेन्सिली आडवी ठेवा. 2 व 3 ही बोटे ताठ करा.
म्हणजे
चारही बोटांच्या पकडीत पेन्सिल धरली जाईल. (आ. 2प्रमाणे.) व शिवाय अंगठा मोकळाच राहील.
आडवे
माप मोजायचे असेल तर मनगटापासून हात वळवून आडवा (आ. 3) किंवा उभा (आ. 4) हात केला
की झाले. या पद्धतीत चारही बोटांच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या घट्ट पकडीमुळे पेन्सिल अजिबात न
हलता घट्ट
खिळल्याप्रमाणे पक्की बसते. शिवाय मागेपुढे फिरवून कमीजास्त माप घ्यायला अंगठा मोकळाच राहतो,
हे
मुख्य फायदे आहेत.
2) हात नेहमी ताठ ठेवा - ताठ हाताची लांबी ठरलेली असल्यामुळे आपण पुढे झुकलो अगर
मागे झालो तरी डोळ्यापासून हाताच्या टोकापर्यंत ताठ हाताचे अंतर न बदलता सदैव कायमच राहते.
हात कोपरात वाकवून मापे  घेऊ लागलो तर हे अंतर क्षणोक्षणी बदलत जाऊन मापांतही फरक पडू लागतो.</p>

<p>3) कोणता तरी एकच्या एकच डोळा मिटवून दुसऱ्या उघडया डोळ्यानेही मापे घ्या. एकदा डावा व
एकदा उजवा डोळा उघडून मापे घेऊ लागलो तर वस्तू जागच्या जागी सरकल्यासारख्या भासतील व
मापांतही फरक पडेल. म्हणून एकाच ठराविक उघडया डोळ्याने माप मोजण्याची सवय ठेवा. अशा
रीतीने प्रत्यक्ष वस्तू आणि आपला डोळा यांच्या मध्ये ताठ हाताने पेन्सिल धरून वस्तूंची आडवी किंवा
उभी मापे मोजा. पेन्सिलच्या टोकापासून अंगठयाने जेथे टेकवले असेल तिथपर्यंतचे अंतर म्हणजे
अचूक माप असते. अंगठा खाली अगर वर सरकवून माप आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येते.</p>

<p>        मापे नेहमी फक्त उभी किंवा आडवीच मोजा. पेन्सिल कधीही तिरकी धरू नका. अशी मापे
हमखास चुकीची ठरतात.</p>

<p>पान नं. - 33</p>

<p>निसर्गचित्र [नेचर ड्रॉइंग ]</p>

<p>        नेचर ड्रॉंइंग हा प्रत्यक्ष नैसर्गिक वस्तुस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण-अवलोकन-करून अनुकरण
करण्याचा विषय आहे शंख, शिंपले, छोटया मोठया वनस्पती, रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे,विविधरंगी पक्षी, मासे
इत्यादी मोहक हालचाल करणारे प्राणी वेडयावाकडया आकारांचे वृक्ष आणि वेली, आकाशातील विविध
रूपात विहरणारे ढग, सप्तंरगी इंद्रधनुष्य, या साऱ्यांच्या रूपांचे, आकारांचे, रंगांचे माणसाला
अनादिकाळापासून आकर्षण वाटत आले आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास , त्यांचे अनुकरण हा
मानवाच्या जिव्हाळ्याचा भाग बनून गेला आहे. निसर्गचित्रण या विषयाला कला परीक्षेत स्थान आहे ते
त्यामुळेच.</p>

<p>        जेव्हा हजारो विद्यार्थ्यांची , वेगवेगळी ठिकाणी परंतु एकाच वेळी परीक्षा घेतली जाते तेव्हा त्यातील
प्रत्येकाला स्वतंत्रपणे देण्याजोगा, नैसर्गिक वस्तूचा नमुना म्हणून पाने व फुले असणारी एखादी झाडाची
फांदीच निवडली जाते. कारण की तीच एक गोष्ट सर्व ठिकाणी विपुलतेने असू शकते. त्यामुळेच
या विषयाच्या पूर्व अभ्यासासाठी झाडाची डहाळीच घेण्याची पद्धत आहे.</p>

<p>        साधारणतः एक वीतभर लांब( 20-25 सेमीपर्यंत) असणारी झाडाची एक फांदी निवडा. तिला चार
पांच पाने व एक तरी फूल असावे. फुलाशिवाय कळ्या वगैरे असल्या तर फारच चांगले. ही फांदी
एखाद्या बाटलीत खोचून अथवा चिखलाच्या गोळ्यात रोवून तुमच्यासमोर ताठ उभी राहील अशी ठेवा.
प्रत्यक्ष रेखाटनाला सुरुवात करण्यापूर्वी ह्या फांदीचे बारकाईने निरीक्षण करा.</p>

<p>पान नं. - 34</p>

<p>        फांदी , पाने व फुले असे तीन वेगवेगळे घटक समजून प्रत्येकाने सूक्ष्म निरीक्षण करा. फांदी
जाड सरळ ताठ आहे का बारीक, लवचिक वाकलेली आहे ? तिला पाने एकाच सांध्यातून फुटत
गेलेली आहेत का एका आड एकेक पान फुटले आहे ? सांध्याच्या ठिकाणी गाठ असून त्यातून पान
बाहेर आले आहे का खांच आहे ? डोळा फुटून त्यातून पान आले आहे का ? इत्यादी सर्व गोष्टींचे
बारकाईने व सूक्ष्म निरीक्षण करावयास हवे. पानांचे निरीक्षण करताना एकंदर बाह्य आकार, पानांची
रुंदी आणि लांबी, तसेच त्या रुंदीचे लांबीशी प्रमाण, याचे सर्वसाधारणपणे अवलोकन. प्रथम करा पानांची
जास्तीत जास्त रुंदी देठाकडे आहे, का मध्यावर आहे, का शेडयाकडे आहे, हे नीट पहा. पानांच्या
आडव्या फुटणाऱ्या शिरा एकाच बिंदूतून दोन बांजूना गेल्या आहेत का त्या एका आड एक अशा गेल्या
आहेत हेही लक्षपूर्वक पाहणे जरुर आहे.</p>

<p>        जी गोष्ट पानांची तीच फुलांचीही. फुलांच्या पाकळ्यांची संख्या , प्रत्येक पाकळीचा आकार,
पाकळीची ठेवण, फुलांच्या प्रमाणेच देठाची लांबी व जाडी इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्यात.</p>

<p>पान नं. - 35</p>

<p>        हे सर्व निरीक्षण झाले म्हणजे मग कागदावर प्रत्यक्ष रेखाटनाला सुरुवात करावयाची. फांदीची
एकूण ठेवण आडवी वाटली तर कागद आडवा धरायचा आणि उभी वाटली तर कागद उभा धरायचा. कागदावर
पुरेशा मोठया आकारात प्रथमतः फांदीची स्थिती ( दिशा आणि जागा ) दर्शवणारी एक मध्यवर्ती रेघ
काढून घ्या. त्या फांदीला जेथे आणि जशी पाने फुटलेली आहेत त्याचप्रमाणे तुमच्या चित्रातील फांदीलाही
त्या त्या जागी पानांच्या दिशेप्रमाणे झुकणाऱ्या पानांच्या मध्यवर्ती रेषा काढा ( पान 36 आकृती एक )
ह्या मध्य शिरेभोवती पानांचा बाह्य आकार रेखांकित करावायाचा हे पुढचे काम . प्रथमतः केवळ
सरळ रेषात व अगदी ढोबळ आकारात केवळ पानांची स्थिती दाखविणारे रेखाटन करा. त्यासाठी सोपा
उपाय म्हणजे एक डोळा मिटून केवळ एकाच उघडया डोळ्याने प्रत्यक पान पाहा म्हणजे त्यातील
घनता नाहीशी  होऊन ते ते पान फुलांचेही असेच ढोबळ रेखाटन करा . ( आकृती 2) एवढे झाले
म्हणजे तुमचे कच्चे रेखाटन झाले.</p>

<p>        पक्क्या रेखाटनाची सुरुवात फांदीपासून करा, फांदीची दिशा, तिची वळणे,  तिचे सांधे, जाडी या
सर्वांचे काळजीपूर्वक अचूक रेखाटन करावयाचे. हे रेखाटन वरच्या टोकापासून खाली उतरत्या दिशेने
करणे फायदेशीर असते. रेखाटन नितळ, ओघवत्या, ठोसदार रेषेने करा. सांधे, डोळे, गाठी इत्यादी
भाग स्पष्टपणे दाखविण्यास विसरू नका. ( आकृती 3) पाने व फुले रेखाटतानाही वरून खाली अशाच
क्रमाने काम करा. पाकळ्यांचा बाह्य आकार, त्यांवरील सुरकुत्या . देठाचे बुडखे या गोष्टी
काळजीपूर्वक दाखवाल तशाच पानांचे बाह्य आकारही प्रवाही वक्र रेषांनी अचूक पणे रेखाटा. एखादे पान
तुटके असेल, किडीने वेडेवाकडे खाल्लेले असेल तर ते तसेच अर्धेमुर्धे रेखाटण्यात गंमत असते. मात्र
त्यामुळे पानांचा बाह्य आकार चुकीचा होणार नाही हही पाहणे जरुर आहे. प्रत्येक पानाची एक
मध्यवर्ती शीर व तिच्या दोन्ही बाजूंना जाणाऱ्या निदान चार पाच तरी आडव्या शिरा तुम्ही
रेखाटावयास हव्यात. पाने अथवा फुले मुख्य फांदीतून फुटून बाहेर आल्याप्रमाणे दिसली पाहिजेत. ती
फांदीला चिकटवली आहेत असे दिसून उपयोगी नाही. पाने, फुले, कळ्या, तुरे इत्यादी सर्व रेखाटन
झाले म्हणजे तुमचे रेखाटन संपले.( आकृती 4) त्यानंतर रंगकामाचा विचार करावयाचा.</p>

<p>पान नं. - 46</p>

<p>6 : स्मरण चित्र [मेमरी ड्रॉइंग]</p>

<p>        चित्रकलेतील सर्वांत आकर्षक आणि महत्वाचा विषय म्हणजे स्मरणचित्र. पूर्वीच्या परीक्षेतही हा
विषय महत्वाचा होताच, परंतु त्याचे स्वरूप बरेचसे रुक्ष ल अनाकर्षक होते . ससा किंवा बेडूक
किंवा चरणारी गाय काढा. एखादा वाद्यांचा अथवा हत्यारांचा संच काढा असे सांगितले जाई. वेळ फक्त
अर्धा तास असे व काम पेन्सिलीने पुरे करावयाचे असे. आता वेळ वाढवून एक तास केला आहे. चित्र
रंगाने रंगवायचे आहे आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातला, त्यांच्या रोजच्या
अनुभवातील एखादा प्रसंग त्यांना चित्रित करावयाचा आहे. साहजिकच चित्रविषयात मुले रंगून जातात व
वेळ किती भरकन निघून जातो हे ध्यानातही येत नाही.</p>

<p>        योग्य ते निरीक्षण करणे, ते ध्यानात ठेवून वेळेवर आठवणे, त्याच्या सहाय्याने स्वतंत्र आणि
आकर्षकता वाढेल असे नवीन रचनचे सुरेख चित्र निर्माण करणे व काळजीपूर्वक रंगयोजना करणे ह्या
सर्व गोष्टी पाहिल्या तर वस्तुचित्र आणि संकल्पचित्र ( प्रत्यक्ष निरीक्षण आणि स्वतंत्र निर्मिती) ह्या
चित्रकलेतील दोन महत्वाच्या मूलभूत घटकांचे मिश्रण होऊनच हा विषय तयार झाला असावा इतके
महत्व ह्या विषयाचे आहे. ह्या विषयाची तयारी कऱण्यासाठी खूप निरीक्षण करणे आणि रचनातंत्राचे
नियम पाळून चित्रनिर्मिती करणे ह्या दोन्ही अंगांचा भरपूर सराव झाला पाहिजे.</p>

<p>                त्यासाठी एक महत्वाची गोष्ट तुम्ही अंमलात आणायला हवी. केवळ ह्या परीक्षेपुरतीच नव्हे
तर पुढे आयुष्यभर चांगली चित्रकला हस्तगत व्हावी असे वाटत असेल तर रोजच्या रोज, सतत
थोडासा फावला वेळ मिळेल त्या वेळी तुमचे रेखाटन सदैव चालत राहिले पाहिजे. हे रेखाटन-कच्चे
रेखाटन , शीघ्र रेखाटन या स्वरूपातच असावे, परंतु ते सदोदित, थोडेथोडे, अखंडपणे चालू राहिले
पाहिजे. एक टिपणवही ( स्केच बुक) आणि एक पेन्सिल, एवढया साहित्यानिशी तुम्ही कुठेही असलात
तरी जे योग्य दिसेल ते ते पाहून रेखाटावयाची सवय लागली पाहिजे. एस.टी. स्टेशन, बाजार, मंडई,
धर्मशाळा, सिनेमागृहे, जत्रा, दुकाने, उपहारगृहे , शाळा आणि क्रीडांगणे, रस्ते, घरे, देवळे, घरातल्या
खोल्या, घराबाहेरचा परिसर ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही पाहून तुमच्या वहीत, कच्च्या स्वरूपात,
जलदपणे काढून ठेवायला हव्यात. त्याचप्रमाणे माणसांच्या हालचाली बसलेली माणसे निजलेली माणसे,
कामात गुंतलेली माणसे, धावणारी-गर्दी करणारी , अशा वेगवेगळ्या माणसांची रेखाटने, वेगवेगळ्या
हालचाली करणारे प्राणी, घरगुती पाळीव पशू व पक्षी इत्यादी तुमच्या हातून प्रत्यक्ष निरीक्षणाने गिरवले
जावे. प्रत्यक्षात पाहावयाला नाही मिळाले तर खुशाल मासिकातली , वर्तमानपत्रातली,</p>

<p>पान नं. - 4</p>

<p>पुस्तकातली चांगली चित्रे पाहून, कच्च्या रेखाटन स्वरूपात ती नकलून ठेवा. एकदा ती तुमच्या हातून
गिरवली गेली. रेखाटली गेली की ती तुमच्या स्मृतीत आणि तुमच्या हातात, द्दढपणे जाऊन
बसल्याशिवाय राहात नाहीत. रोजच्या रोज, थोडा वेळ का होईना, पण एखाद्या व्रताप्रमाणे शीघ्ररेखाटनाचे
काम चाललेले पाहिजे 'गाता गळा' सुधारतो, तसाच रोजच्या रेखाटनांनी 'हात' तयार होतो ही फार
महत्वाची गोष्ट नेहमी स्मरणात ठेवावी.</p>

<p>        ही पूर्वतयारी पुरेशी झाली म्हणजे परीक्षा विषयाचा अर्धा टप्पा तुम्ही हस्तगत केल्याप्रमाणे होईल,
निरीक्षण , स्मृतीप्रतिमांची धारणा, आणि त्या प्रतिमांचे प्रत्यावाहन करण्याची क्षमता तुमच्या अंगी आली
असे समजण्यास हरकत नाही. आता प्रश्न येतो ह्या स्मृतीप्रतिमा कशा तऱ्हेने तुम्ही लोकांसमोर मांडू
शकता त्याचा परीक्षकांची अशी अपेक्षा आहे की तुमच्या स्मृतीप्रतिमा मांडताना तुम्ही त्यातून एक सुरेख
संयोजनचित्र तयार करावे. या चित्रातून दिलेला विषय तर स्पष्टपणे दिसावाच परंतु त्याबरोबर त्याला
चित्राचे गुणविशेष म्हणजे आकारांचा मेळ आणि तोल, लय, रंगाचा मेळ हेही जडलेले आहेत, ते एक
चांगले रचनाचित्र निर्माण झाले आहे, असेही त्यातून व्यक्त व्हावे. त्यामुळे चांगले चित्र म्हणजे    काय ?
चित्ररचनेची काही वैशिष्टये असतात का ? याचाही विचार करणे भाग पडते. चांगल्या चित्ररचनेचून
(1) आकार घटकांचा सुसंबंध (2) महत्वाच्या घटकाला प्राधान्य, (3)आकार घटकांचा एकसंधपणा
(4) रचनेच्या योगाने चित्राच्या सर्व क्षेत्रभर लक्षवेध व्हावा, (5) रचनेतील तोल आणि लय, यांची
जाणीव व्हावी.</p>

<p>        ही वैशिष्टये साधावयाची असतील तर चित्ररचनेचे काही ढोबळ नियम पाळले पाहिजेत, त्यांचा
आपण क्रमाने विचार करू.</p>

<p>(1) चित्रघटकातील आवश्यक ते आकार एकमेकांशी निगडीत असावेत, सुटे किंवा अलग रेखाटू नयेत.</p>

<p>पान नं. - 48</p>

<p>(2) मध्यवर्ती कल्पना व्यक्त करणारा घटक चित्राकाराच्या शक्यतितका मध्यबिंदूनजिक ठेवावा.</p>

<p>(3) अगदी सरळ रेषांत नजर फिरण्याऐवजी चित्रघटकांचा वेध लयबद्ध वक्र रेषेने घेणे प्रेक्षकाला अधिक
सुखावह ठरते.</p>

<p>        हा वक्र रेषांचा नजरेचा प्रवास साधण्यासाठी एक नियम समजावून देतो. तो असा की चित्रात
एका कोणत्याही जागी एखाद्या माणसाचे डोके काढले तर त्या डोक्याच्या सरळ आडव्या पट्टयात
किंवा सरळ उभ्या</p>

<p>पान नं. - 49</p>

<p>पटटयात दुसरे कोणाचेही डोके येता उपयोगी नाही. ते जरासे वर अथवा खाली किंवा जरासे बाजूला
असावे. असे झाले तर आपोआपच सर्व व्यक्ती सरळ रेषेत न येता वर्तुळाकारात येतील.</p>

<p>द्दष्टी सर्व चित्रभर फिरावी, ती वर्तुळाकारात फिरावी, तशीच</p>

<p>(4) ती चित्राकारातच फिरावी, चित्राच्या बाहेर जाऊ देऊ नसे.</p>

<p>पान नं. - 50</p>

<p>वरील नियम पाळले तर आपोआपच चित्रघटकांचा एकसंधपणा, आकाराचा सुसंबंध, नजरेचा क्षेत्रभर वेध
चित्रातली तोल व लय , या गोष्टी जमून येतात. म्हणूनच सरावासाठी ज्या ज्या वेळी तुम्ही असे
चित्र काढावयास घ्याल त्या त्या वेळी वरील नियमांचे पालन करून चित्र अधिकाधिक निर्दोष करण्याचा
प्रयत्न करा.</p>

<p>
पान नं. - 74</p>

<p>8 : मुक्तहस्त चित्र [फ्री हॅण्ड ड्रॉइंग]</p>

<p>        सराव होण्यासाठी ज्या काही गोष्टी कवायतीसारख्या पुनः पुनः कराव्या लागतात त्याही महत्वाच्या
असतात. चित्रकलेमध्ये फ्री हॅण्ड ड्रॉइंग हा विषयही असाच महत्वाचा आहे. सफाईदार,लयबद्ध,
ओघवती रेषा सहजपणे काढता येणे हा चित्रकलेतील कौशल्याचा भाग असतो. आणि हे कौशल्य केवळ
सरावानेचे येऊ शकते. आपल्या भारतात दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या अजंठयाच्या लेण्यांपासून  तो
थेट अगदी नव्या दिल्लीतील आधुनिक संसदगहापर्यतच्या अनेक शिल्पाकृती आणि वास्तू पाहिल्या तर
त्यातील नक्षीकाम आणि शोभाकृती, आपल्या कसबी कारागिरांनी, केवळ हातांनीच-कसल्याही यांत्रिक
किंवा कृत्रिम किंवा कृत्रिम साधनांची मदत न घेता अतिशय सफाईदारपणे आरेखित केल्याचे आपणांला
आढळून येते. मग त्या धावत्या किनारपट्टया असोत, पानाफुलांचे विविध आकार असोत किंवा प्राणी,
पशुपक्षी अथवा मानवाकृती असोत. रेषेचील ओघ,लय आणि सहज वळणांचा डौल आपले मन आकर्षित
करून घेतल्याशिवाय राहात नाही. 'सौदर्यपूर्ण रेषांचा मनोहर विलास' ही भारतीय कलाकारांची परंपरा
आहे. तीच परंपरा, तोच वारसा, जिवंत ठेवण्यासाठी, निदान त्याची ओळख ठेवण्यासाठी, फ्री हॅण्ड
ड्रॉइंग हा विषय चित्रकला परीक्षेत ठेवण्यात आला. हा विषय तसा महत्वाचा नाही. गौणच आहे. परंतु
म्हणून तो दुर्लक्षून चालत नाही. त्यातही आपल्याला चांगली कामगिरी दाखवता आली पाहिजे.</p>

<p>        लयबद्ध रेषा काढण्याच्या सरावाप्रमाणे आणखीही काही गोष्टी या विषयात पाहिल्या जातात. एक
म्हणजे तुमचे अचूक निरीक्षण. लयबद्ध रेषाकृतींनी जे आकार तयार होतात त्यांचे क्षेत्र, त्यांचे
एकमेकांशी पाहिले जाते. पहिल्या परीक्षेत चित्रकाम फक्त पेन्सिलीनेच पुरे करावयाचे असते. दुसऱ्या
परीक्षेत ते रंगवून पूर्ण करावयाचे असते. त्यामुळे त्या परीक्षेसाठी जी नमुन्याची आकृती तुम्हांला
नकलण्यासाठी दिलेली असते. तीही रंगीतच असते. ते रंग आणि त्या रंगछटा तुम्ही अचूकपणे
तंतोतंतपणे तुमच्या कामात दाखवू शकता काय, हेही तेथे पाहिले जाते.</p>

<p>                थोडक्यात म्हणजे फ्रीहॅण्ड विषयाच्या परीक्षेत -
                1) रेषेतील सहजता, लयबद्धता, सफाई -
                2) एकदंर आकृतीबंधाच्या लहान लहान आकारांचे एकमेकांशी तुलनात्मक प्रमाण, त्यांची
बांधणी त्यांचे निश्चित स्थान याची जाणीव आणि -
                3) अचूक रंग व रंगछटांची समज- या तीन कसोटया असतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
                या तीनही गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे.
                ह्या अभ्यासाला लागण्याच्या आधी केवळ प्राथमिक तयारी म्हणून हात वळण्याचे ,
वळवण्याचे काही काम करणे आवश्यक आहे. हे काम किंवा सराव पाटीवर पेन्सिसीने केला तरी
चालेल. परंतु तो रोज निदान 15 ते 20 मिनिटे असा सतत एक आठवडाभर तरी केला पाहिजे.</p>

<p>पान नं. - 75</p>

<p>1) सरळरेषा - मग त्या आडव्या उभ्या, तिरप्या, कोणत्याही दिशेने असोत-पट्टी न वापरता
काढणे, प्रत्येक रेघ कमीत कमी 15 सें.मी. लांबीची तरी असलीच पाहिजे.</p>

<p>2) पाव व अर्ध आकाराची वर्तुळे पूर्ण वर्तुळे, इंग्रजी S आकाराचे वर्तुळाकार हेही उलटसुलट वाटेल
त्या दिशेने काढणे. हे वर्तुळकार उगाच लहान लहान काढू नयेत. साधारणतः 7 ते 10 सें.मी. व्यास
तर कमीत कमी असावाच.</p>

<p>        पाटीवर पेन्सिलीने गिरवण्याबरोबर कागदावरही अधिक मोठया प्रमाणात या विविध आकारांच्या रेषा
गिरवण्याचा काही दिवस सराव करावा.</p>

<p>        3) एका कागदावर मध्यभागी सरळ रेषा आखून घ्यावी. त्या रेषेच्या एका बाजूला, रेषेला खेटून
कशाही वर्तुळाकार रेषांनी काहीही आकार काढावेत. मग त्या रेषेच्या दुसऱ्या बाजूस तेच आकार
आरशातील प्रतिमेप्रमाणे उलट काढावेत. ते लहान मोठे येतील. कदाचित समतोलही चुकेल. परंतु
मुळीच घाबरू नये. कारण हा सरावाचा भाग आहे.</p>

<p>        याप्रमाणे काही दिवस सराव झाल्यावर या विषयाच्या अभ्यासाला लागायचे. अभ्यासासाठी पान 81
वर
जे नमुने दिले आहेत, ते क्रमवार काढावयाचे आहेत. हे सर्व नमुने लहान प्रमाणात आहेत परंतु त्यांचे
रुपांतर मात्र मोठया प्रमाणात करणे आवश्यक आहे. ( लहान नमुन्याचे मोठया प्रमाणात चित्र किंवा या
उलट मोठया नमुन्याचे लहान प्रमाणात चित्र काढता आले पाहिजे.) ते कसे करावयाचे ते आता पाहू.</p>

<p>        फ्री हॅण्ड विषयाच्या चित्रीकरणासाठी जे नमुने देण्यात येतात ते प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात.
एक प्रकार समअंगचित्र व दुसरा विषम अंग चित्र. समअंगचित्र म्हणजे चित्राच्या मध्यावर रेघ मारली
असताना</p>

<p>पान नं. - 76</p>

<p>रेघेच्या एका बाजूकडील रेषांचे आणि आकृतींचे दुसऱ्या बाजूस असणारे तंतोतंत सारखे परंतु उलट (
आरशातील प्रतिमेप्रमाणे) चित्रीकऱण. अशा पद्धतीच्या आकृतीत उलट सुलट बाजू अचूक काढणे हेच
अधिक महत्वाचे ठरते. याउलट विषमअंग आकृतीत एकच एक आकृती विशिष्ट लयीत. विशिष्ट
आकारात काढलेली असते. तिला मध्य, दोन बाजू असा काही भाग नसतोच. या दोन्ही प्रकारांपैकी
कोणताही एक प्रकार परीक्षेत काढावयास दिला जातो. पूर्वीच्या काळी नेहमी प्रमाणे सम अंग
आकृतींनाच प्राधान्य असे. हल्ली विषम अंग आकृतींना प्राधान्य आहे. आपण विषमअंग आकृतींचा
अभ्यास करू आणि नंतर समअंग आकृतीकडे वळू.</p>

<p>*
----------------------------------------------------------------</p>

<p>THE END</p>

<p></p></body></text></cesDoc>